नान हुआ विहार
नान हुआ विहार (इंग्रजी: Nan Hua Temple) हे आफ्रिकेतील सर्वात मोठे बौद्ध विहार आणि विद्यालय आहे. हे विहार दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉन्खोर्स्टस्प्रूफ येथील कल्टुरा पार्क उपनगरात वसलेले आहे. हे फू गुंग शेन ऑर्डरचे आफ्रिकन मुख्यालय आहे, जे ६०० एकर क्षेत्र व्याप्त आहे.