नाथ पंथाचा इतिहास
नाथ पंथाचा इतीहास🌴
नाथांच्या भक्तीने भारावलेला भक्त नाथांच्या दर्शनासाठी वेडापिसा होतो तत्त्वज्ञाना साठी वणवण भटकतो ,कारण तत्त्वज्ञानात गुढ आहे. जन्म मृत्यु रहस्याचे !ते जसे दुर्गम वाटतेतसेच विश्वाच्या उत्पत्तीचे गुढच आहे. महादेवीने गोरक्षनाथाना विश्वनिर्मितीचे गुढ विचारले होते. कारण गोरक्षनाथहे एक नाथ पंथीय योगी होते. व त्यांच्या तोंडुन हे गुढ उकललेले ऐकावे असा मानस महादेवीचा होता. परंतु गोरक्षनाथानीही महादेवीला सांगीतले की हे महादेवी त्यावेळी महानंदा देव होते. आनंदमय महदेवाने विश्वाची स्वयमनिर्मीती केलीत्याआदिदेव आदीनाथापासुन इचछाशकती निर्माण झाली व द्न्यानातुन क्रया शक्ती निर्माण झाली त्यातुनच जगाची उत्पत्ती झालीजगात उत्पत्तीचा आध्यात्मिक इतीहासअशा तऱ्हेने श्री गोरक्षनाथानी गोरक्ष उपनिशदात सांगीतला. तो तर्कशुद्ध आहेजीवशिवाच्या भेटीची ओढ लागलेला जीव विचारांती श्री गोरक्षनाथांच्या तर्कशुद्ध विवेचनाचाच विचार गंभीरपणे करु लगतो व हळूहळू त्याच्या तर्कशुद्धतेचा अभ्यास करून मानवाच्या निर्मीतीतुन ईश्वरभक्तीचा भास अभास उदय - अंत ,लय - विलय ,प्रकाश - अंधार ,पृथ्वी- आकाश, देव - दानव स्थितीचा वेध घेत असतो या वैचारिक वेधातुनच ईश्वरनिर्मीतीची कल्पना उगम पावते व मानवी मन भक्तीकडे वळते. भुत वर्तमान भविष्य या कालाच्या कला विचारात घेवुन मानवान आपल्या जीवनाला कक्षा दिल्या. तशीच कक्षायुगायुगांची पृथ्वीला दिली. ती देववाणीतुन भगवान श्रीकृष्ण म्हणतात, " ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो त्या त्या वेळी मी अवतार
घेतो ." आणि भगवान कृष्णाच्या उक्तीची प्रचीती आध्यात्मिक भावनेतुन व तात्त्विकवैचारिक दिशेतुन ,जरी संतांच्या कार्या कडे पाहीले तरी येतेयेशु ख्रिस्ताचा जन्म ,महम्मद पैगंबराचा जन्म ,बौद्ध व महविरांचा जन्म आद्य शंकराचार्यांचा जन्म ,ऐतिहासिकदृष्ट्या देखील भगवान कृष्णाच्या उक्ती प्रमाणे " संभवानी युगे युगे प्रमाणे झाले आहे.'
या उक्तीची प्रचीती इतीहासाला ह्य भारत -भुमीवर जन्म घेतलेल्या नवनरायण नवनाथानी दिलेली आहे.
नवनाथांच्या इतिहासाचा शोध घेणे सोपी नाही.दंत कथांच्या सहाय्याने त्यांच्या जन्माविषयीचे निरनिराळे अर्थ काढावे लागतातत्यातुन वैचारिक होत नाही समाधान होत नाही .असे विद्वानाना वाटतेपण नदीचे मुळ व ऋषीचे कूळ शोधु नये म्हणतात. त्याप्रमाणे नवनथांच्या जन्माविषयी गुढ आहे. णवनथांचे यौगिक कार्य इतके मोठे आहे प्रभावी आहे की त्यांच्या मुळ जन्म कथांचा ऐतिहासिकभाग कोठेच धृत होत नाही .व दंत कथातुन निघणारे निष्कर्ष ऐतिहासिक कसोटीला उतरत नाहीत तसेच तेथे तात्त्विक विचारांच्या मंथनाला वाव मिळत नाही. नवनाथांचा जन्म अयोनीसंभव आहे व तो यौगिक मुल्याचा आहे .
मच्छिंद्रनाथ:-
मच्छिंद्रनाथांचा जन्म माशापासुन झालेला आहे ब त्याना माशाच्या उदरात असतानाच शिवा कडुन ब्रम्हद्यान प्राप्त झाले. "तो क्षीर कल्लोळाआतु ,मकरोदरी गुप्त होता तयाचा हातु ,पैठे जाले तो मच्छिंद्रसप्तश्रुंगी,भग्नाथा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण जाला" द्न्यानेश्वरी अठरव्या अध्यायातील बरील उल्लेखावरून मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला याचा आध्यात्मिक बोध होतोमच्छिंद्रनाथांचे यौगिक जीवन जल त्राटकातुन सुरू झाले आहे. म्हणुन त्यांचा जन्म जलाशी दाखवला आहे.
गोरक्षनाथ :-
गोरक्षनाथांचा जन्म मच्छिंद्रनाथांच्या कृपा प्रसादाने झाल्याची कथा सर्वशृत आहे. ती कथा अशी की ." मच्छिंद्रनाथानी सूर्यबिज अभीमंतृन ते भस्म एका विप्र स्त्रीस दिले. त्या विप्र स्त्रीने ते भस्म उकीरड्यावर टाकले व त्यात जीवधारणा निर्माण झाली ह्याचा अर्थ गोरक्षनाथ हे सूर्य त्राटक करीत असतत्यामुळे नाथपंथात त्यांचे भौतिकसामर्थय व व्यक्तीमत्व सूर्यासारखे आहे. कबिर . गोरक्षाच्या भेटीचा संबंध ऐतिहासिकदृष्ट्या जसा उत्तर हिंदुस्तानात येतो तसाच दक्षिण हिंदुस्तानातही द्न्यानेश्वरांचे पणजोबा त्रंबकपंत यांचे भेटीत येतो. किंबहुना महाराष्ट्रात नाथपंथाच्या वास्तव्याची जाणिव त्रंबकपंताच्या व गोरक्षनाथांच्या भेटीनेच होते गोरखनाथांचा मठ अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण या डोंगराबर आहे. नासिक येथील त्रंबकेश्वरी गोरखनाथांची जशी गुंफा आहे तसाच आखाडा ही आहे. या आखाड्याची स्थापना विक्रम संवत्सर९२३ साली झाली अशी नोंद या आखाड्यातील ताम्ब्रपटावर पहाबयास मिळते. ह्या वरून असे दिसुन येते की गोरक्षनाथांचे वास्तव्य ९ व्या शतकापासुन १३व्या शतकापर्य्नत होते.
जालिंदरनाथ:-
जालिंदरनाथ यांची जन्म कथाही पौराणिकच आहे. ऱाजा ब्रम्हदेव यानी यद्न्य केला असता अग्नी प्रसन्न होवुन त्यांनी राजाला पुत्ररत्नाचा प्रसाद दीला. जालींदर नाथांचा जन्म अग्नीतुन झाला त्याअर्थी जालिनदर नाथ हे अग्नी त्राटकातुन योगी अवस्थेत आले आहेत .....
कानिफनाथ:
सिद्धकानिफनाथाला अर्थात प्रबुद्धनारायणाला हत्तीच्या कानातुन जालिनदर नाथानी बाहेर काढलेह्याचा अर्थ एकांतात बसुन कानिफनाथ गणेशोपासना करीत असले पाहीजेत कानिफनाथ ही *अग्नीत्राटकातुन योगी अवस्थेत आले .
गहीनीनाथ :-
यांचा जन्म कर्दमपुतळ्यापासुन झालेला आहे. गोरक्ष संजीवनी मंत्र पाठ करीत असताना लहान मुलाना खेळण्यासाठी मातीचा पुतळा बनवुन देतो,पण संजीवणी घोकत असल्याने त्या पुतळ्याला संजीवणी प्राप्त होते. पुढे गोरक्षनाथ गहीनी नाथाना दिक्षा देवुन तपाला बसवतातम्हणजेच गहीनीनाथ तपपुर्व बिंदुत्राटक करत असावेत ......
रेवणनाथ:-
रेवणनाथ यांचा जन्म रेवातीरी नदीकाठी रेतीत झाला. म्हणजेच नदीकाठी बसुन ते जलत्राटक करत असावेत .....
चर्पटनाथ:-
चर्पटनाथ यांचा जन्म नदीकाठी दर्भात दाखविलेला आहे म्हणजेच चरपटीनाथही जलत्राटक करत असावेत. पण इतर सर्व जलत्राटका साठी दर्भासन वापरत पण रेवणनाथ हे रेतीआसन वापरीत .....
वटसिद्ध नागनाथ:-
वटसिद्ध नागनाथ याचा जन्म एका झाडाच्या ढोलीत नाग अंडजातुन होतो ह्याचा अर्थ नागनाथ हे ढोलीत बसुन बिंदु त्राटक ही साधना करत असावेतया साधनासाठी त्यानी सर्पाची कात हे आसन घेतलए होते ......
भर्तरीनाथ:-
भर्तरीनाथ यांचा जन्म कौशिकऋषी यांच्या आश्रमात झाला असावाते भिक्षेसाठी बाहेर निघाले असताना भिक्षापात्र अंगणात ठेवले होते. ते दार बंद करण्यास गेले असताना सूर्यतेज भिक्षापात्रात पडले ते पात्र कौशिक ऋषीनी मंदराचलीच्या गुहेपाशी नेवुन ठेवलेह्याचा अर्थ भर्तरी हे कौशिकऋषी यांच्या सान्निध्यात सूर्य त्राटक करीत असावेत. सूर्यसाधनेपासुन प्राप्तझालेले तेजपाहुन कौशिक ऋषीनी त्याना साधनेसाठी गुहेत नेवुन बसवले असले पाहीजे ....