Jump to content

नाणेफेक (क्रिकेट)

क्रिकेटच्या सामन्याचा सुरुवातीस दोन्ही संघाचे नायक नाणेफेक करून फलंदाजीचा क्रम ठरवतात. यासाठी दोन बाजूस वेगवेगळे छाप असलेले नाणे वापरले जाते. सहसा त्यांना छापा (व्यक्तीचे चित्र असलेली बाजू) किंवा काटा (व्यक्तीचित्र नसलेली बाजू) असे म्हणतात. यजमान संघाचा नायक हे नाणे हवेत उडवतो. नाणे हवेत असताना पाहुणा नायक छापा किंवा काटा (इंग्लिश:हेड्स किंवा टेल्स) असा कौल देतो. नाणे जमिनीवर स्थिरावल्यावर जी बाजू अस्मानाकडे असेल तो कौल ठरतो. जर पाहुण्या नायकाने तोच कौल दिला असेल तर तो नाणेफेक जिंकतो नाहीतर यजमान नायक नाणेफेक जिंकतो.

कौल जिंकलेला नायक आपला संघ आधी फलंदाजी करणार कि गोलंदाजी हे दुसऱ्या नायकास सांगतो.