Jump to content

नाट्यदर्पण (ग्रंथप्रकाशक)

नाट्यदर्पण नावाची एक प्रकाशन संस्था आहे. ही संस्था फारशी प्रसिद्ध नसली तरी तिने संत तुकारामांनी लिहिलेल्या भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथ प्रकाशित केला आहे. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली होती असे या प्रकाशकांचे म्हणणे आहे. तुकारामांच्या या तथाकथित भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ ’नाट्यदर्पण’ने प्रसिद्ध केला आहे.. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे, असे प्रकाशक म्हणतात. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथ लिहिला आहे.. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.

नाट्यदर्पण या प्रकाशनसंस्थेचे आणखी एक पुस्तक आहे. ते म्हणजे कविता गाडगीळ यांनी लिहिलेले ’भरारी राजहंसाची’ या नावाचे [[जे.आर.डी. टाटा] यांचे चरित्र. ही दोन्ही पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत, असे समजते.

’नाट्य दर्पण’ नावाचे एक नियतकालिकही आहे.