नाटककार
{{}}नाटकांचे लेखन करणारा म्हणजे नाटककार. कवी कालिदास तसेच भास हे आद्य नाटककार आहेत. पु. ल. देशपांडे तसेच शफाअत खान, प्रेमानंद गज्वी हे समकालीन नाटककार आहेत.
【【भारतीय रंगभूमीवरील नाटककार]]
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय संख्याशास्त्रज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत. धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील सांखोल येथे झाला. गोवा ही तेव्हा पोर्तुगीजांची वसाहत होती. धर्म-जिज्ञासा, ज्ञान-पिपासा आणि आध्यापन हेच ज्यांच्या जीवनाचे प्रेरक हेतु होते असे धर्मानन्द कोसंबी एखादें नाटक लिहितील असें कोणाला स्वप्नींही वाटलें नसतें. पण ते तरी काय करतील ? भक्कम ऐतिहासिक पुराव्यावाचून ऐक वाक्यही लिहवयाचें नाहीं अशा वृत्तीनें आजन्म ज्यांनी बोलण्या लिहिण्याचें काम केलें. त्यांना गौतम बुद्धाच्या गृहत्यागाची आणि प्रवज्याग्रहणाची नवीन व संयुक्तिक उत्पत्ति सुचली असतांना आणि ती उत्पत्ति खरी असावी असें वाटण्याइतका मुबलक पुरावा मिळूनही तो अपुरा असल्याची रुखरुख लागली असतानां त्यांना काय करावें ? शेवटीं त्यांनी आपलीं उत्पत्ति या नाटकाच्या रूपांत मांडून संतोष मिळवला. ज्या राजपुत्रानें लहानपणींच लिपि शिकून घेऊन सर्व शास्त्रांत प्रवेश करून घेतला होता, शस्त्रविद्येंत ज्यानें प्राविण्य मिळवलें होतें. आणि ज्याला लग्न होऊन एक मूलही झालें होतें, त्याला जरा, व्याधिं आणि मरण यांची कल्पनाच नसावी आणि त्यांचे दर्शन होतांच त्याला घर सोडून जाण्याची बुद्धि व्हावी हें देखील अनैतिहासिक आणि असंभवनीय वाटतें. आणि त्या राजपुत्राला जन्म, मृत्यु, जरा आणि व्याधि यांचे जें औषध सांपडलें तें देखील जगांतील भौतिक जरा, व्याधि आणि मरण यानां दूर करूं शकले आहे असेंही नाहीं. तृष्णा नाशानें वासना-मूलक दुःखें दूर होतील, सम्यक् आजीवानें कित्येक व्याधि टळतील. सम्यक कर्मांन्ताच्या योगानें पापाकडील ओढा नाहिसा होईल. सम्यक दृष्टीनें मोह दूर होईल. पण प्रत्येक शरीराच्या वाट्याला असलेलें मरण कांहीं टळणार नाहीं. ज्या मरणाचें दर्शन राजपुत्र गौतमाला झालें होतें तें मरण तथागत बुद्धाला देखील टळलें नाही ! यावरून असेंच समजलें पाहिजे कीं ज्या गोष्टीची तळमळ बुद्धाला लागली होती आणि ज्या दुःखाचा परिहार त्याला सांपडला तें केवळ शारीरिक दुःख नसून तें समाजिक दुःख होतें. माणसा-माणसांतील व्यवहार जर शुद्ध असला आणि व्यक्तीचें जीवन जर असामाजिक नसलें तर व्यक्ति आणि समाज दोघेहि सुखी होतील. नेहमीच्या व्यवहारांत जे चुकीचे आदर्श बाळगले जातात आणि राष्ट्रांराष्ट्रांच्या व्यवहारांत जी नैतिक शिथिलता आढळून येते त्याचा उपाय बुद्धाला सांपडला आणि तो त्यानें लोकांना जन्मभर उपदेशिला. पारलौकिक इतिहास-भूगोलाच्या कल्पना लोक पुराणांतून वाचतात. स्वतःच्या चुकांचें खापर दैवाच्या अथवा दैवी व्यक्तींच्या माथीं फोडतात आणि भोगविलासांनी क्षीण झाल्यानंतर दुस-या टोकाला जाऊन देहदंडन करणे हाच उपाय आहे असें मानतात, आणि ज्याप्रमाणें इहलोकीं राज्यकर्त्यांना लांच देऊन कायद्याला धाब्यावर बसवितां येते त्याचप्रमाणें देवदेवींना यज्ञयागादिकाची लांच देऊन कर्माच्या आणि कर्मफलाच्या सार्वभौम सिद्धांताच्या कचाटयांतून सुटून जाण्याची आशा बाळगतात. या सर्व गोष्टींचें वैयर्थ्य सिद्धार्थाला पटलें आणि त्यानें मनुष्य जातीला या भ्रम–जालांतून सोडविण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीनें पाहतां धर्मानंदांनी येथे मांडलेली उत्पत्ति अधिक सयुक्तिक वाटते. आणि म्हणावेसें वाटतें कीं गौतमाच्या वैराग्याला कारण कांहींही झालेलें असो, प्रस्तुत नाटकांत दिलेल्या उपपत्तिनंतरच बुद्धाचा उपदेश आपल्याला आधिक चांगल्या रीतीनें पटतो. जुनें बुद्धचरित्र देखील खरोखर एक अनैतिहासिक रसिक नाटकच आहे ! प्रस्तुत नाटकांत धर्मानंदांनीं सत्याग्रह शब्द आणल्यामुळें गांधीयुगाची छाया त्याच्यावर पडलीशी दिसते. पण “सत्याग्रह” हें नांव जरी नवें असलें तरी सत्याग्रह ही वस्तु माणुसकीच्या प्रेम-धर्माला किंवा हृद्य-धर्माला अपरिचित नाहीं.
या नाटकांतील प्रत्येक प्रवेश बुद्धकालीन सामाजिक जीवनांचे एक एक दृश्य चित्रित करतो. त्यामुळें बौद्ध पर्वाचा इतिहास समजून घेण्यास प्रस्तुत नाटक बरेंच उपयोगी पडेल. ‘नाटक म्हणजे दृश्य काव्य.” या व्याखेच्या कसोटीवर प्रस्तुत नाटक कसून पाहण्याची आवश्यकता नाहीं. बोधिसत्वाच्या जीवनाची उपपत्ति लावण्यासाठीं धर्मांनंदानी निबंधाच्या ऐवजी नाटकाचा प्रकार अवलंबिला एवढेंच. तरीही नाटकाच्या तंत्रांत त्यांनी केलेली एक सुधारणा स्वीकारण्याजोगी आहे. जुन्या रामलीलांमध्ये केव्हां केव्हां सूत्रधार सर्व वेळ रंगभूमीवर एका बाजूला उभा असे आणि नाटकाच्या पात्रांमध्यें आणि श्रोत्यांमध्ये दुभाष्याचें काम करी पण ख-याखु-या नाटकांमध्ये सूत्रधार नाटकाला प्रारंभ करून देऊन जो गुप्त होतो ते शेवटच्या भरतवाक्यापर्यंत प्रगट होत नाहीं. नाटकांतील मुख्य मुख्य दृश्यांमध्यें सांधा जुळविण्यासाठी नाटककारांना विष्कंभकाची युक्ति योजावी लागते. यांत जरी कवीचे चातुर्य प्रगट होत असलें आणि त्यामुळें आपण ‘तदानीन्तन’ आहोंत हा भास जरी कायम टिकत असला तरी खरोखर इतकी मेहनत घेण्याचे कारण नाहीं. एका प्रवेशावर किंवा अंकावर पडदा पडला म्हणजे सूत्रधारानें स्वतः पुढें येऊन पुढील कथानकाची तयारी करून देण्यास काहींच हरकत नाही.
भारतीय लोकांविषयी कथन करतांना एका इंग्रज लष्करी अंमलदारानें कोठेसें म्हटलें आहे कीं ‘पृथ्वीराजच्या काळापासून आजपर्यंत हिंदुलोक नवे कांहींच शिकले नाहींत आणि जुने कांहींच विसरले नाहींत.’ बुद्धकाळचें हें चित्र वाचल्या नंतर म्हणावें लागतें कीं ‘पृथ्वीराजाच्या’ ऐवजीं ‘सिद्धार्थाच्या’ काळापासून असें म्हटलें पाहिजे. आणि जर दुस-या कोणी म्हटलें कीं “कौरवा पांडवाच्या काळापासून” असेंच का म्हणाना ? तर तें ही स्वीकारावें लागेल. शाक्य आणि कोलिय यांची भांडणे आपण आजही भांडत आहोंत आणि गण-राज्यांतील दुर्बलता आजही आपण दूर करूं शकलों नाहीं.
सारांश:- बोधीसत्त्व नाटकाचे लेखन ही मोठीच सांस्कृतिक कामगिरी धर्मानंद कोसंबी यांनी बजावली आहे.त्यांचे हे कार्य विलक्षण आहे.आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे प्रगल्भ चिंतन-लेखन कालातीत आहे. असे चिंतन काळसापेक्ष ठरते. तुलनात्मक लेखन करत असताना निःपक्षपाती लेखन दुर्मीळच आढळते पण आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे भाष्य समर्पक ठरते. काळाच्या कसोटीवर उतरणारे प्रभावी नाटककार म्हणून धर्मानंद कोसंबी यांच्या कडे पाहता येईल. तत्कालीन परिस्थिती आपल्या संवादातून मांडण्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यशस्वी ठरतात. काळाच्या पुढे पाहणारा नाटककार म्हणून बौद्ध साहित्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे अढळ स्थान आहे.हिंदू धर्मात प्राचीन काळचे यज्ञयाग, त्यानंतरच्या स्मृतींतून व्यक्त झालेलें कर्मकांड आणि वर्णाश्रम धर्माचा विस्तार, त्या बरोबरच उपनिषद् काळापासून चालत आलेली तत्त्वज्ञानाची चर्चा आणि आत्म्यापरमात्म्याचा शोध या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यांतूनच पुढें योगमार्गाची साधना उत्पन्न होऊन तिला हठयोग आणि राजयोग असे दोन फाटे फुटले. पुढे मंत्र आणि तंत्र यांचे प्रस्थ माजलें. व्रतें आणि उत्सव यांचे मोठें अरण्य फोफावलें आणि हिंदुधर्म म्हणजे एक महाकांतार होऊन बसला.या सर्व जटिलतेमधून धर्मतत्त्वांना वाचविण्याचें काम भगवान बुद्ध ,भगवान महावीर यांनी आणि त्यांच्यानंतर आलेल्या साधुसंतांनी केले.
आत्मविकासाला बाधक अशा वासनांवर विजय मिळवावा, सदाचारानें चालावें, अहंकाराचा नाश करावा, समाजाची बिघडणारी घडी त्यागधर्म आणि दानधर्म यांच्या द्वारा सुधारत जावी आणि पंचशील तत्त्वांचे पालन करून जीवनाचे सार्थककारावे हाच बौद्ध धर्माचा गाभा होय. वर्णव्यवस्थेनें समाजांत उच्चनीच भाव उत्पन्न केला आणि व्यक्तीचें जीवन एकांगी केलें. आणि जातिभेदानें तर समाजाचे तुकडेच पाडले. यांचा थोडाफार विरोध या सर्व सुधरकांनी केला.
हीच परंपरा सध्याच्या काळी बोधी रंगभूमी करीत आहे. बोधी म्हणजे पूर्णज्ञान; आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठीं जो अविश्रांत प्रयत्न करणारा सत्त्व म्हणजे प्राणी, तो बोधिसत्व होय. अत्यंत प्राचीन कालीं हे विशेषण गोतम बुद्धाला त्याच्या जन्मापासून ते त्याला सम्बोधि प्राप्त होईपर्यंत लावीत असत, असें नालक सुत्ताच्या वत्थुगाथांवरून दिसून येते. त्या बोधिसत्वाच्या जीवनचरित्राची त्रिपिटक ग्रन्थाच्या आधारें रूपरेषा आखण्याच्या उद्देशानें बोधीसत्त्व हे नाटक लिहिलें आहे.बोधीसत्त्व हे तथागत गौतम बुद्धचरित्र व सम्यक संबुद्धांच्या विचारांचा वेध घेणारे प्रभावी नाटक आहे.
[【संदर्भ]】*:-
1.जातककथा 2.बुद्धकथा 3.भगवान गौतम बुद्धचरित्रात्मक ग्रंथ 4.बोधि-सत्त्व (मराठी नाटक) 5.विसुद्दीमग्ग : पाली ग्रंथ 6. भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी:डिंगणकर, डॉ मधुसूदन ,नचिकेत प्रकाशन,नागपूर. 7.आचार्य धर्मानंद कोसंबी आत्मचरित्र: गोवा हिंद असोसिएशन 8."धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे संक्षिप्त चरित्र" 9.बोधी : कला-संस्कृती: प्रेमानंद गज्वी 10.भारताचा सांस्कृतिक इतिहास: रा. वि. ओतुरकर 11.प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास: र. ना. गायधनी 12.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म: डॉ. बी.आर. आंबेडकर(आवृत्ती १९७०)
【【 रामू रामनाथन 】】
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये योगदान देणारा, कधीही समोर न येऊ दिलेल्या किंवा विरून गेलेल्या घटना, व्यक्ती, इतिहास इत्यादींचा शोध घेऊन, त्यावर संशोधन करून त्या प्रक्रियेतून सापडलेलं सत्य नाटकांतून मांडणारा द्रष्टा नाटककार म्हणजे रामू रामनाथन!
कॉटन 56 पॉलिस्टर 84, कॉम्रेड कुंभकर्ण, महादेवभाई (1892-1942), द डायरी ऑफ अ वर्ड, पोस्टकार्ड फ्रॉम बारडोली, द बॉय हु स्टॉप्ड स्माईललिंग, यार! व्हॉट इज द कॅपिटल ऑफ मनिपुर, शांती! शांती! इट्स अ वॉर, नथिंग-अ प्ले विदाऊट वर्ड्स अशी 30 विविध नाटकं रामू रामनाथने लिहिली आहेत.
आपल्याला माहित नसलेल्या, मात्र महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे समाजाचे लक्ष वेधण्याच्या हेतूने रामू रामनाथन नाटकं लिहितात. दडपल्या गेलेल्या आवाजांनी व्यक्त व्हायला नेहमीच कोणत्याना कोणत्या मार्गाने वाट शोधलेली आहेच आणि ‘नाटक’ हे त्यासाठीचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम ठरलेलं आहे. रामू रामनाथनची नाटकं मूळ इंग्रजी भाषेत असली तरी आजवर ती विविध भाषांमध्ये सादर झालेली आहेत. द डायरी ऑफ अ वर्ड’ चं मराठी रूपांतर ‘शब्दांची रोजनिशी’ हे त्यातलंच एक उदाहरण.