नाझरा
नाझरा महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेले गाव आहे.
नाव
नाझरा हे नाव कसे मिळाले याबाबत बऱ्याच आख्यायिका आहेत. परंतु त्यातील मुख्य आख्यायिका आहे ती 'बारमाही दुष्काळ' म्हणजेच इथे फारसे पाण्याचे झरे नाहीत म्हणून याला 'नाझरे' असे नाव मिळाले. प्रसिद्ध संत कवी श्रीधरस्वामी नाझरेकर हे नाझऱ्याचे होते.[ संदर्भ हवा ] 'श्रीधरस्वामी नाझरेकर' हे त्यांचे पूर्ण नाव होते. पांडवप्रताप, शिवलीलामृत यासारखे साहित्य त्यांनी रचले.
माण नदीच्या काठी वसलेले हे गाव पंचक्रोशीतील सर्वांत मोठे गाव आहे. याला जशी संत साहित्याची परंपरा आहे तशीच त्याला सर्वधर्मसमभाव जपणारे गाव अशी ओळख आहे. माण नदीच्या काठावर वसलेले असल्याने याला माणदेशाचा भाग मानले जाते.