Jump to content

नागेश भोंसले

नागेश भोंसले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. हे मुख्यत्वे खलनायकांच्या भूमिका करतात. भोंसले यांनी सुरुवातीस सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्याबरोबर मराठी रंगभूमी वर काम केले. चंद्रलेखा, कलावैभव अशा काही संस्थांच्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. कलावैभवच्या वन रूम किचन नाटकात त्यांना हणम्याची भूमिका वठवली. मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी व इंग्लिश रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी काम केले.

कॉटन ५६ पॉलिस्टर ४४ या मुंबईतील बंद गिरणीतल्या गिरणी कामगाराच्या जीवनावर बेतलेल्या इंग्लिश नाटकात भोसले यांनी एका गिरणी कामगाराची भूमिका केली होती. रामू रामनाथन यांनी हे नाटक लिहिले होते आणि सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केले होते. याच्या चेतन दातारद्वारा हिंदीमध्ये भाषांतरित नाटकातही भोसले यांनी हीच भूमिका केली. त्यानंतर भोसले यांनी चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करायला सुरुवात केली.

अजय सिन्हा यांच्या चूल आणि मूल या एका माहितीपटात नागेश भोसले यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका केली. लहान वयात मुलींचे लग्न लावू नका. वयात आल्यानंतरच लावा. अशा प्रकारचा संदेश त्या माहितीपटाद्वारे देण्यात आला होता. त्यानंतर अजय सिन्हा यांनी भोसलेंना त्यांच्या हसरतें या हिंदी दूरचित्रवाहिनींवरील मालिकेत काम दिले.

नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका (पात्राचे नाव)

  • Cotton 56 Polyester 44 (इंग्रजी/हिंदी नाटक; गिरणी कामगार)
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी (मराठी चित्रपट;)
  • चल धरपकड (म‍राठी चित्रपट);
  • चिमणी पाखरं (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पतंगराव कुराडे)
  • चूल आणि मूल (माहितीपट; मुलीचे वडील)
  • दामिनी (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पक्या)
  • देवयानी (मराठी दूरचित्रवाणी मालिका; सर्जेराव पाटील अर्थात आबासाहेब)
  • नातीखेळ (मराठी चित्रपट; खाशाबा)
  • धग (मराठी चित्रपट;)
  • बनगरवाडी (मराठी चित्रपट;)
  • मनातलं ऊन (मराठी चित्रपट;)
  • हिच्यासाठी काय पण
  • वन रूम किचन (मराठी नाटक; हणम्या)
  • Sex Morality and Censorship (इंग्रजी नाटक)
  • हसरतें (हिंदी दूरचित्रवाणी मालिका; किशन मुरारी)
  • तु.का. पाटील (मराठी चित्रपट) []

नागेश भोसले यांना मिळालेले पुरस्कार

  • ‘कॉटन ५६ पॉलिस्टर ४४’ या नाटकातील भूमिकेसाठी दिल्लीतील महेंद्र ॲकॅडमीचा पुरस्कार लाभला. (हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्काराइतकाच मानाचा आहे.)
  • शांता गोखले यांनी लिहिलेल्या ‘सेक्‍स मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’ या नाटकातील भूमिकेसाठीही महेंद्र ॲकॅडमी पुरस्कार.

बाह्य दुवे

[][]

  1. ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/tukapatil-coming-soon/21086
  2. ^ https://www.majhapaper.com/2013/07/26/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa/
  3. ^ "संग्रहित प्रत". 2020-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-18 रोजी पाहिले.