Jump to content

नागपूर-सिकंदराबाद रेल्वेमार्ग

नागपूर-सिकंदराबाद रेल्वेमार्ग
प्रदेश तेलंगाणा व महाराष्ट्र
मालकभारतीय रेल्वे
चालक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, मध्य रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ५८१ किमी (३६१ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण होय
कमाल वेग १३० किमी/तास


नागपूर-सिकंदराबाद रेल्वेमार्ग हा नागपूर आणि सिकंदराबादला जोडणारा रेल्वे मार्ग आहे. [] या ५८१-किलोमीटर लांबीच्या (३६१ मैल) मार्गाचा, नागपूर ते काझीपेट मार्ग हा दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गाचा भाग आहे. हा दिल्ली-हैद्राबाद रेल्वेमार्गाचा देखील भाग आहे. हा मार्ग मध्य रेल्वे आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे.

इतिहास

१९२९ मध्ये काझीपेट-बल्लारशाह दुवा पूर्ण झाल्यानंतर, चेन्नई थेट दिल्लीशी जोडले गेले. []

वाडी-सिकंदराबाद मार्ग १८७४ मध्ये हैदराबादच्या निजामाने वित्तपुरवठा केल्याने बांधला गेला. ते नंतर निजामाच्या गॅरंटीड स्टेट रेल्वेचा भाग बनले. १८८९ मध्ये, निजामाच्या गॅरेंटीड स्टेट रेल्वेच्या मुख्य मार्गाचा विस्तार विजयवाडापर्यंत (तेव्हाचे बेझवाडा) करण्यात आला. []

१९०९ पर्यंत, "ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेवरील वाडीपासून, निजामाची गॅरंटीड स्टेट रेल्वे पूर्वेकडे वारंगलपर्यंत आणि नंतर दक्षिण-पूर्वेकडे मद्रास रेल्वेच्या पूर्व किनारपट्टीवरील बेझवाडाकडे जात असत." []

विद्युतीकरण

काझीपेट-रामागुंडम क्षेत्राचे १९८७-८८ मध्ये, रामागुंडम-बल्लारशाह-नागपूर क्षेत्राचे १९८८-८९ मध्ये, काझीपेट-सिकंदराबाद क्षेत्राचे १९९१-९३ मध्ये आणि माजरी-राजपूर क्षेत्राचे १९९५-९५ मध्ये विद्युतीकरण झाले. []

गती मर्यादा

दिल्ली-चेन्नई मध्यवर्ती रेल्वेमार्ग (ग्रँड ट्रंक रूट) ही "ग्रुप ए" लाईन म्हणून वर्गीकृत आहे, ज्यावर गाड्यांना १६०किमी/ता पर्यंत वेगाने धावायला परवानगी आहे . []

वाडी-सिकंदराबाद-काझीपेट मार्ग "ग्रुप बी" मार्ग म्हणून वर्गीकृत आहे, ज्यावर गाड्यांना १३०किमी/ता पर्यंत वेगाने धावायला परवानगी आहे . []

प्रवासी वाहतूक

या मार्गावरील नागपूर आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानके, भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च शंभर बुकिंग स्थानकांपैकी एक आहेत. []

संदर्भ

  1. ^ Chakraborty, Aniket (2017-04-03). "Russian Railways to sign Nagpur–Secunderabad line modernisation contract". www.rbth.com. 2020-07-06 रोजी पाहिले.
  2. ^ "IR History: Early Days – III". Chronology of railways in India, Part 3 (1900–1947). 26 November 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "IR History: Early days II". 1870–1899. IRFCA. 26 November 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Hyderabad – Imperial Gazetteer of India". IRFCA. 26 November 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "History of Electrification". IRFCA. 26 November 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "Chapter II – The Maintenance of Permanent Way". 26 November 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "Chapter II – The Maintenance of Permanent Way". 4 December 2013 रोजी पाहिले.
  8. ^ "Indian Railways Passenger Reservation Enquiry". Availability in trains for Top 100 Booking Stations of Indian Railways. IRFCA. 10 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 November 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे