नाखोन राच्चसीमा
नाखोन राच्चसीमा हे थायलंडच्या इसान प्रांतातील चार प्रमुख शहरांपैकी एक आहे,याला कोराट असेही नाव आहे. हे शहर नाखोन राच्चसीमा प्रांत आणि मुआंग नाखोन राच्चसीमा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून बँकॉक आणि च्यांग माई नंतरचे थायलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे.
हे शहर कोराट पठाराच्या पश्चिमे टोकावर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ते लाओ आणि सियाम प्रदेशांमधील सीमेवर होते
२०१९मध्ये शहराची लोकसंख्या १,२६,३९१ होती तर महानगराची लोकसंख्या २०२२ च्या अंदाजानुसार ४,५०,००० होती.