नाकेर
नकेर, नकटा, नंदिमुख (इंग्लिश: Nakta, comb Duck) हा एक पाणपक्षी आहे.
नाकेर आकाराने बदकापेक्षा मोठा असतो.त्याचा वरून रंग काळा असतो. त्यावर हिरवी व निळी झाक असते.खालील भागाचा रंग पांढरा असतो.डोक्यावर व मानेवर काळे ठिपके असतात.उडताना पंखावर ठळक पांढरा डाग दिसतो.नराच्या चोचीवर नाक असते. म्हणून त्याला नाकेर म्हणतात.म्हणून इंग्रजीत त्याला कॉम्ब डक म्हणतात.नाकेर व नाकेरी दिसायला सारखेच असतात.परंतु नाकेरी बारक्या चणीची असते.तिच्या चोचीवर नाक नसते.विणीच्या हंगामात नाकेराच्या कोंब जांभळा एवढा असतो.नाकेर स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी असतो.पाकिस्तान सिंध व भारतात नेपाळ तराईपासून ते दक्षिणेकडे कर्नाटक आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रह्मदेश आढळतात.नाकेर दलदल असलेली सरोवरे आणि भातशेतीच्याप्रदेशात आढळतो.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चीतमपल्ली