Jump to content

नाईल नदी

आफ्रिकेच्या नकाशावर नाईल नदी

नाईल (अरबी: النيل) ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.

नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती इथियोपिया ध्वज इथियोपिया, इजिप्त ध्वज इजिप्त,सुदान ध्वज सुदान,युगांडा ध्वज युगांडा,Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकटांझानिया ध्वज टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदानइजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नील नदीच्या उपनद्या

अटबारा नदी निळ्या नाईल संगमाच्या खाली अटबारा नदी आहे, साधारणतः ताना तलावाच्या उत्तरेस इथिओपियामध्ये उगम पावते. सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) लांब आहे. इथिओपियामध्ये पाऊस पडतो तेव्हाच अटबारा नदी वाहते.मुखाजवळ तिचे पात्र १५० किमी रुंद आहेत.

चित्रदालन

व्हिडियो

संदर्भ

बाह्य दुवे