Jump to content

नांदणीगायगोठा

  ?नांदणीगायगोठा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ१.०६८६२ चौ. किमी
जवळचे शहरवाडा
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,३९६ (२०११)
• १,३०६/किमी
भाषामराठी
सरपंचप्रशांत खांडवी
बोलीभाषावारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४२१३१२
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

नांदणीगायगोठा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे डाकीवळीफाट्याने गेल्यावर राजन हरचेकर कंपनी,आणि चौधरी पाडा वसाहत गेल्यानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ३४ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७६ कुटुंबे राहतात. एकूण १३९६ लोकसंख्येपैकी ६९८ पुरुष तर ६९८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६०.८१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.५९ आहे तर स्त्री साक्षरता ५३.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १५.५४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

डोंगस्ते, बिळवळी, बुधावळी, गुंज, काटी, अंबारभुई, निंबावळी, गोराड, केळठण, लोहापे, मुसरणे ही जवळपासची गावे आहेत.नांदणीगायगोठा ग्रामपंचायतीमध्ये अंबरभुई आणि नांदणीगायगोठा ही गावे येतात.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/