Jump to content

नसरुद्दीन

१७ व्या शतकातील नसरुद्दीनचे एक लघुचित्र

नसरुद्दीन (तुर्किश: नसरुद्दीन होजा, ऑटोमन तुर्किश: نصر الدين خواجه, पर्शिअन: خواجه نصرالدین‎, पश्तो: ملا نصرالدین‎, अरेबिक: نصرالدین جحا‎ / ALA-LC: Naṣraddīn Juḥā, उर्दू: ملا نصرالدین ‎, उझ्बेक: Nosiriddin Xo'ja, Nasreddīn Hodja, बोस्निअन: Nasrudin Hodža) हा तेराव्या शतकात रुमच्या सेल्जुक सल्तनतीमधील अक्शेहिरमध्ये होऊन गेलेला (आजचा टर्की) सेल्जुक सुफी मानला जातो. लोकप्रिय तत्त्वज्ञ आणि शहाणा मनुष्य म्हणून ओळखला जाणारा हा नसरुद्दीन गमतीशीर गोष्टींसाठी आणि चातुर्यकथांसाठी प्रसिद्ध आहे. हजारो कथांमध्ये तो शहाणा, चतुर माणूस भेटत असला तरी बऱ्याचदा वेडगळ मनुष्य म्हणूनही अनेक कथांमध्ये तो आढळतो. नसरुद्दीन कथा ही गर्भित विनोद असलेली बोधप्रद कथा असते. दरवर्षी त्याच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय नसरुद्दीन होजा महोत्सव ५-१० जुलैदरम्यान आयोजित केला जातो.