नवीन पनवेल
नवीन पनवेल हे पनवेल शहराचे जुळे शहर व पनवेलचे एक उपनगर आहे. हा नोड मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गाच्या दक्षिणेस व पनवेलच्या उत्तरेस वसवला गेला असून काळुंद्री नदी नवीन पनवेलच्या दक्षिणेकडून वाहते. पनवेल रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख उपनगरी स्थानक आहे.