नवी मुंबई महानगरपालिका परिवहन
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (Navi Mumbai Municipal Transport; संक्षेप: एन.एम.एम.टी.) ही महाराष्ट्र राज्याच्या नवी मुंबई शहरामधील एक परिवहन सेवा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवली जाणारी ही सेवा २३ जानेवारी १९९६ रोजी सुरू झाली. २०१५ साली एन.एम.एम.टी.च्या ताफ्यातील ३०८ बसेस नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, खारघर-तळोजे, पनवेल इत्यादी अनेक भागांमध्ये कार्यरत आहेत. एन.एम.एम.टी.द्वारे अनेक मार्गांवर वातानुकुलित बसेस देखील चालवल्या जातात.
बाहय दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत