Jump to content

नवा मराठी चित्रपट

नवा मराठी चित्रपट ही संकल्पना विशिष्ठ काळामध्ये प्रदर्शीत केलेल्या मराठी सिनेमाच्या वर्णन करताना वापरली गेलेली संकल्पना म्हणून मांडता येईल .मराठी सिनेमाचे बदलेले स्वरूपाची ओळख ही काळानुरूप बदललेले आहे . विषयाची विविधता त्यात दिसून येते . ही संकल्पना समजून घेताना आरती वाणी यांनी लिहिले आहे कि, नवा मराठी चित्रपट हा मराठी चित्रपटाचे स्वरूप बदललेले दिसून येते. "डिजिटल तंत्रज्ञानाच्या स्वीकार ,माध्यम विश्व बदलल्यामुळे आपले जीवन हे ढवळून निघाले आहे ., असे आरती वाणी मांडतात . मराठी चित्रपट हे भारतीय सिनेमायुगाच्या प्रारंभ काळात प्रादेशिक सिनेमातील एक सशक्त प्रवाह होता .परन्तु गेल्या काही दशकात मात्र त्याची दखल घेतली गेली नाही .श्वास हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाल्यानंतर मराठी सिनेमाची दखल घेतली गेलि. मराठी सिनेमातील नव्या प्रवाहातील प्रत्येक सिनेमा हा नवीन विचाराचा असला आणि नवीन प्रयोग करणारा असला तरी तो कथेच्या बाबतीत मात्र वेगळी दिशा शोधताना दिसतो . अर्ध्या दशकाच्या कालावधीमध्ये डोंबवली फास्ट [२००५] , वळू [२००८] , ग्राभीचा पाऊस , जोगवा , हरीश्चन्दाची फक्टरी [२००९], विहीर , नटरंग [२०१०] असे आणि इतरही खूप संख्येने सिनेमे आता आजवर दुर्लक्षित अशा विषयाकडे आणि परिघबाहेरिल विषयांकडे वळले आहेत मराठीतील सिनेमा पाहण्यारयाची संख्या आता वाढताना दिसून येत आहे ही वाढ मल्टीप्लेक्स , विविध चित्रपट महोत्सव यातून आवड निर्माण होताना दिसून येते आहे . श्वास हा लो- बजेट सिनेमा एक आजोबा आणि एक कॅन्सर ने दुष्टी गमावणाऱ्या त्याचा नातू याचे कथानक आहे . जे मराठी सिनेमातील कथानक आणि सिनेमातील भावूक वास्तव वादाचे चित्रण प्रत्येकाला सिनेमाच्या कथेमध्ये खिळवून ठेवतात. या चित्रपटाने २००४ साली मराठी चित्रपटाला मुख्य प्रवाहात आणले. आरती वाणी यांनी केलेल्या नवा मराठी सिनेमाचा अभ्यास करताना नटरंग आणि जोगवा या दोन मराठी सिनेमाचा केलेला अभ्यास पाहता येईल .पहिला सिनेमा हा लोकप्रिय तमाशा परंपरेतील आहे तसेच गाणी आणि नाच आला आहे . तर दुसरा सत्तरीच्या दशकातील समांतर सिनेमातील सामाजिक वास्तवाचे सत्य कथन करतो . तरल आणि व्दिधाभावी पुरुषाना त्यांच्या अस्मिताना मोकळे करतात .

नटरंग

  • नटरंग हा तमाशात नाचणाऱ्या स्त्रीला साथ देणाऱ्या नाच्याची पुरुष व्यक्तिरेखा आहे . या सिनेमातून गुणा शेतमजुराच्या दुष्कर संघर्षानंतर आधी तमाशातील शाहीर नंतर नाच्या म्हणून मिळवलेले यशाची कथा यात येते . नटरंग हा पहिला व्दिधाभावी पुरुषत्वासाठी अवकाश निर्माण करतो .

जोगवा

  • जोगवा हा राजीव पाटील याचा सिनेमा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भाग मध्ये अजूनही चालणाऱ्या प्रथेचे मांडणी करतो . यल्लम्मा भक्त खडतर आयुष्य जगत असतात . देवीच्या भक्तावर मग मुलगी असो व मुलगा त्यावर ही गुलामगिरी लादली जाते . परंपरेच्या नावाखाली आयुष्यभर लुगडे नेसायन्यासाठी त्यांच्यावर दडपण घातले जाते . जोगवा सिनेमा तायाप्पा या नायकाच्या लुगडे गुंडाळलेल्या शरीलाला पुरुषसत्तकतेच्या समीक्षेची जागा बनवतो .

नटरंग आणि जोगवा

नटरंग आणि जोगवा हे दोन्ही सिनेमे मराठी सिनेमाचा पुरुष सैल करत, विस्तारतात आणि प्रवाहीही बनवतात . समलिंगी संबंधाना मान्यता देण्यापर्यंत हे सिनेमा येत नाही तर सिनेमातील दोन्ही नायक हे समलिंगी संबंधाला त्याच्या त्याच्या परीने विरोध करताना पुढे येतात .तरीही विरोधालिंगी पोशाख प्रधान करतात परलिंगी प्रतिमा याच्या वापराने सिनेमातून एक नवे अवकाश निर्माण करतात . जोगवा सिनेमामध्ये आलेले गाणे हे वेगळ्या शैलीतून पुढे येतात . यातील 'जीव रंगला ' हे गाणे वेगली मांडणी करते कारण यामध्ये दोघे ही साडीत आहेत पण आपल्याला माहीतही असते कि , ते भिन्न लिंगी आहेत . यात मराठी सिनेमांचा नव्या अवकाशाचा आणि अस्मिताचा धांडोळा जरी केला असला तरी प्रेक्षक हा समलिंगी जवळकीचे , सुखदेखील त्यात समाविष्ट करतो. []

सारांश

नवा मराठी सिनेमा मध्ये येणाऱ्या विषयांची विविधता पाहताना आरती वाणी यांनी केलेल्या नटरंग आणि जोगवा या दोन नवीन मराठी चित्रपटांची मांडणी पाहिली . मराठी चित्रपटामध्ये येणारे विषय आता त्याची सीमारेषा ओलांडत आहेत . ज्यामुळे परीघाबाहेरील , केद्रबाहेरील लोकांचे जीवन चित्रपटांतून दिसत आहे आणि त्याच बरोबर जनसामान्याचे विषयही आणि अडचणी , समस्याही चित्रपटांतून आले आहे. बालगंधर्व हा मराठी सिनेमा संगीतनाटकाचा काळाचे वर्णन करतो . ज्याची कथा ही बालगंधर्व या व्यक्तीच्या संगीत नाटकामध्ये कार्यरत असणाऱ्या यश - अपयशाची आहे . नवीन तंत्रज्ञनाचा म्हणजे मराठी चित्रपट निर्मितीचा परिणाम हा नाट्यगृहावर कसा झाला याचेही वर्णन करतो .७२ मैल , ग्राभ्रीचा पाउस , प्रकाश आमटे , प्रियतमा , इतर सारखे चित्रपट विविध विषयाची मांडणी करतात .या विषयाची विविधता ही एकाच पातळीवर मयादित राहत नाही .समाजातील बहुतांश गोष्टी त्यात मांडल्या जात आहे . नवा मराठी सिनेमा हा त्याच्या महत्त्वाच्या विषयातून समाजातील इतर घटकापर्यंत प्रश्न ,समस्या पोहोचवण्याचे कामही करत आहे . शेतकऱ्याचे प्रश्न , गरिबांचे प्रश्न , तरुण पिढीचे प्रश्न , इतर ही त्याच्या अख्यातरीत आलेले आहेत .

  1. ^ वाणी ,आरती (२०१३) वाटसरू : दिवाळी अंक .द युनिक अकॅडमी (अनुवाद शरद नवरे- ‘नवा मराठी सिनेमा’ : नव माध्यमाच्या संदर्भात )