नवा जिहादी जॉन
नवा जिहादी जॉन तथा सिद्धार्थ धर तथा अबू रूमायसाह हा आयसिसचा दहशतवादी आहे.
जिहादी जॉन नावाने ओळखला जाणारा दहशतवादी अमेरिकेने नोव्हेंबर २०१५त सीरियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. त्यांचे नाव इंग्लंडमधील दुसऱ्या दहशतवाद्याला देण्यात आले आहे.
हा भारतीय वंशाचा असल्याचे मानले जाते. त्याचे नाव सिद्धार्थ धर असे असून त्याच्या बहिणीचे नाव कोनिका धर आहे. ही लंडनमध्ये राहते.
याने हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मातरित झाल्यावर अबू रूमायसाह असे नाव धारण केले आहे. ब्रिटिश गुप्तहेरांना ठार मारतानाचा त्याचा एक व्हीडिओ प्रसारित झाला आहे.