Jump to content

नवरेह

काश्मिरी हिंदू पंडित

नवरेह हा काश्मीरमधील हिंदू पंडितांचा नववर्ष सण आहे[]. चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा होतो. पाडव्याला नवरेह म्हणले जाते. वसंताचे स्वागत करणारा दिवस म्हणूनही हा सण ओळखला जातो.[]

उत्सवाचे स्वरूप

या दिवशी शारदेच्या मंंदिरात जाऊन सरस्वतीची पूजा करतात.[] घरातील महिला आदल्या रात्री एका थाळीत थोडे उकळलेले आणि थोडे शिजवलेले तांंदूळ, अक्रोड, मध, दह्याचा वाडगा, फुले, रुपया, मीठ, दौत आणि लेखणी किंवा लेखनाचे साहित्य व नव्या वर्षाचे पंंचांंग ठेवतात. यामधे वचा नावाची औषधी वनस्पती आणि देवाची मूर्तीही ठेवलेली असते. या सर्व वस्तू समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. []मुहूर्तावर उठून सगळे आरशात चेहरा पाहतात, आणि ताटात ठेवलेल्या या सर्व वस्तूंचे दर्शन घेतात. या थाळीचे दर्शन घेणे हा या दिवसाचा महत्त्वाचा उपचार आहे. थाळीतील तांंदुळाचा साखरभात नंतर प्रसाद म्हणून वाटतात. [] हरी पर्वत नावाच्या परिसरात काश्मिरी पंडित देवीच्या दर्शनाला जातात.[]

  • अन्य -

या दिवशी नक्षत्र पत्री म्हणजेच पंचांगाचे विशेष महत्त्व असते. परस्परांना फळे आणि अक्रोड भेट दिले जातात. चार मुखे असलेल्या ब्रह्मा देवतेचे या दिवशी आवर्जून दर्शन घेतले जाते.[]

शरद ऋतूतील नवरात्री उत्सवाप्रमाणे चैत्र महिन्यातही देवीचे नवरात्र साजरे करण्याची प्रथा भारताच्या विविध प्रांतात दिसून येते. काश्मीरमध्ये चित्र शुक्ल प्रतिपदा या दिवसापासून देवीचे नवरात्र साजरे होते.

हे सुद्धा पहा

  • काश्मीर
  • गुढी पाडवा
  • उगादी
  • पुंथंडु

संदर्भ

  1. ^ a b Raina, Mohini Qasba (2014-11-13). Kashur The Kashmiri Speaking People (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing Singapore. ISBN 9781482899450.
  2. ^ डाॅॅ.लोहिया शैला,भूमी आणि स्त्री,२०००,गोदावरी प्रकाशन,पृृष्ठ २५८
  3. ^ Pandit, Bansi (2005). Explore Hinduism (इंग्रजी भाषेत). Heart of Albion. ISBN 9781872883816.
  4. ^ a b Toshakhānī, Śaśiśekhara (2010). Rites and Rituals of Kashmiri Brahmins (इंग्रजी भाषेत). Pentagon Press. ISBN 9788182744752.
  5. ^ Toshakhānī, Śaśiśekhara; Warikoo, Kulbhushan (2009). Cultural Heritage of Kashmiri Pandits (इंग्रजी भाषेत). Pentagon Press. ISBN 978-81-8274-398-4.