Jump to content

नवनीत गौतम

नवनीत गौतम हे भारतातील खूप प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. तसेच जयपूर पिंक पॅंथर्स साठी २०१४ साली कर्णधार म्हणूनही ते खेळले. २०१५ साली झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये दुखापतीमुळे जास्त सामने खेळू शकले नाहीत.

योगदान

नवनीत गौतम हे पकडपटू आहेत. ते संघातील सर्वात डावीकडील बाजूला असतात. पट काढणे हे त्यांचे प्रसिद्ध कौशल्य आहे. २०१० व २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये नवनीत गौतम यांनी मोलाचे काम केले होते. २०१४ साली झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये जयपूर पिंक पॅंथर्स संघ नवनीत गौतम यांच्या मार्गदर्शनाखली महाविजेता झाला होता. ‎