Jump to content

नळिया

नळिया गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील छोटे शहर आहे.

हे शहर अबडासा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. नळिया वायुसेना तळ येथून जवळ आहे.

नळिया जखौ या जुन्या बंदरापासून १९ किमी अंतरावर असून १७ व १८व्या शतकात येथून झांझीबार आणि मुंबईशी मोठा व्यापार होत असे. १८८०मध्ये येथील लोकसंख्या ५,२३८ होती[] तर २००१ च्या जनगणनेनुसार ही संख्या ८,८६८ होती.

हे गाव राष्ट्रीय महामार्ग ८अवर आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी: कच्छ, पालनपूर ॲंड मही कांठा. 1880. pp. २४४.