नल
दमयंतीचा पती पुण्यश्लोक नल राजा हा महाभारतातील (वनपर्व, अध्याय ५३ ते ७८) एक राजा होता. हा उत्तम सारथी होता. राजहंस पक्ष्याबरोबर त्याने दमयंतीला निरोप पाठविला होता. या कथेवर आधारलेले ‘नल-दमयंती आख्यान’ प्रसिद्ध आहे. या कथेवर अनेक भारतीय लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-
- नल-दमयंती (हिंदी, जयदयाल गोयन्दका, गीता प्रेस)
- नल दमयंती (मराठी, शकुंतला पुंडे)
- नल-दमयंती स्वयंवर (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
- Nala and Damayanti (इंग्रजी, किरीट जोशी)
- Nal & Damyanti (इंग्रजी नाटक)
- Nala Damayanti (इंग्रजी, कॉमिक पुस्तक)
पहा :- पुण्यश्लोक, महर्षी आणि महात्मा