Jump to content

नर्मदा बचाओ आंदोलन

नर्मदा ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मधून वाहणारी भारतामधील एक प्रमुख नदी आहे. नर्मदा बचाओ आंदोलन हे नर्मदा नदीवर भारतातील गुजरात राज्यात बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले व मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन आहे.

चित्रपट तारकांच्या पाठिंब्यामुळे ह्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. चित्रपट नायकांमधील उल्लेखनीय नाव म्हणजे आमीर खान. या आंदोलनाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांना Right Livelihood Award [] देऊन १९९१ मध्ये गौरवण्यात आले आहे.

या चळवळीत अनेक आदिवासी,गावे,पर्यावरण कार्यकर्ते आणि मानवाधिकार कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांनी नर्मदा नदीच्या तुलनेत मोठ्या संख्येने असलेल्या धरणाबद्दल त्यांची मते मांडली होती.

नर्मदा वाचवा आंदोलनावरील पुस्तके

  • नद्या आणि जनजीवन : नर्मदा खोऱ्यातील लोकांच्या संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज (संजय संगवई)
  • मेधा पाटकर : नर्मदा संघर्ष (दीपक चैतन्य)
  • लढा नर्मदेचा (नंदिनी ओझा)
  • समग्र माते नर्मदे (डाॅ. दत्तप्रसाद दाभोळकर)
  1. ^ http://rightlivelihood.org/