Jump to content

नर्मदा निधी

नर्मदा निधी ही कोंबडीची एक रोगमुक्त प्रजाती आहे.[] मध्य प्रदेशातील पशुवैद्यकीय विद्यापीठाने प्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या ‘कडकनाथ’ व ‘जबलपूर कलर’ या कोंबड्यांच्या प्रजातीच्या जनुकांचा समावेश करून ही प्रजाती तयार केली आहे. त्यांना प्रतिजैविके खाऊ घातली जातात, त्यामुळे या कोंबड्या सेवन केल्याने मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो पण या कोंबड्यांना रोग होत नसल्याने कुठल्या कृत्रिम औषधांचा वापर त्यांच्यात करावा लागत नाही.

नर्मदा निधी प्रजातीच्या कोंबड्या स्वस्त व पौष्टिक आहेत. ग्रामीण भागातील गरीब लोकांकरिता कोंबड्यांची ही प्रजाती विकसित केली आहे. ती ग्रामीण भागात घरातील खरकट्या अन्नावर वाढू शकते व या कोंबड्यांना रोग होत नाहीत, त्यांना परदेशी कोंबड्यांप्रमाणे लसी द्याव्या लागत नाहीत. डाळींचे भाव वाढल्यानंतर गरिबांना अन्नातून प्रथिने मिळावीत, यासाठी ही कोंबडीची प्रजाती उपयोगी आहे. साध्या देशी कोंबड्या ४९ अंडी देतात तर नर्मदा निधी ही कोंबडी १८१ अंडी देतात. यातील एक अंडे ६ रुपयांना पडते. या कोंबडीचे मांस किलोला १२० रुपये दराने मिळते. या कोंबडीची चव देशी कोंबडीसारखी आहे.

संदर्भ