नरेंद्र बुधकर
डाॅ. नरेंद्र बुधकर हे एक वैद्यकीय व्यावसायिक असून उत्तम तबलावादक आहेत.
पुण्यात एका मध्यमवर्गीय कलाप्रेमी, रसिक कुटुंबात वाढलेले नरेंद्र बुधकर वैद्यकीय शिक्षण घेऊन मित्रांच्या आग्रहास्तव अमेरिकेला गेले. एक तबलावादक म्हणून त्यांनी अमेरिकेतील आणि युरोपातील अनेक मैफलींना साथ संगत केली. असे करताना त्यांना अमेरिकेत आलेले अनुभव त्यांनी त्यांच्या 'जाता पश्चिमेच्या घरा' या पुस्तकात अत्यंत संवेदनशीलपणे नोंदले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ४ मार्च २०१८ रोजी उल्हास पवार यांच्या हस्ते झाले.