नरसाळे
नरसाळे (आडनाव) याच्याशी गल्लत करू नका.
नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरांत वापरण्यात येणारी विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते. ह्याचा उपयोग कोणत्याही निमुळत्या/अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओतण्यासाठी होतो. प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचे असते तर घरात वापरण्यात येणारे धातुचे असते.