नमुरचा बालेकिल्ला
नमुरचा सिटाडेल हा एक किल्ला आहे. नमुर बेल्जियमच्या वालून क्षेत्राची राजधानी आहे. येथे सांब्रे आणि मियुझ नद्यांचा संगम होतो. हा रोमन काळापासून आहे. परंतु बऱ्याच या सिटाडेलची पुनर्बांधणी केली गेली. सद्यस्थितीचे डिझाईन मेन्नो व्हॅन कुहॉर्न यांनी बनवले होते. याला १६९२ च्या वेढ्यानंतर वौबन तर्फे सुधारण्यात आले. ही वास्तु वॉलोनियाच्या मेजर हेरिटेज साइट म्हणून वर्गीकृत केलेली आहे. याची सर्वात उंच जागा १९० मीटर आहे.
याचा मुळ किल्ला स.न. ९३७ मध्ये बांधला गेला होता. हे शहर डच लोकांच्या ताब्यात असताना १६३१ ते १६७५ च्या दरम्यान या शहराला वैभव प्राप्त झाले. सध्याची रचना जवळच १५४२ मध्ये बांधलेल्या छोट्या किल्ल्यापासून वेगळा करणाऱ्या विभागाला "टेरा नोवा" असे नाव दिले आहे. १८ व्या शतकामध्ये विविध प्रकारच्या सहाय्यक ईमारती बांधण्यात आल्या. स.न. १८९१ मध्ये हा सिटाडेल सैन्याच्या हालचालींमधून वगळण्यात आला. नमुरच्या आसपासच्या किल्ल्यांच्या रचनेमुळे हे शहर तोफखानाच्या हल्ल्यापासून बचावले. हा सिटाडेल आर एफ एन कमांड पोस्टसाठी वापरण्य्यात येतो.[१]
दीनांत, हुई आणि लीज यांच्याबरोबर मिळून, नामूरचा सिटाडेल, तथाकथित म्यूसेस किल्ल्यांचा एक भाग आहे.
- नामूर, म्यूसेस, वॉलोनियाचे संसद आणि गडा
- नामूरचा किल्ला
- जॅम्बेस ब्रिज ओव्हर द म्यूज, किल्ल्यासमोर
हे सुद्धा पहा
- नामूर शहराचा इतिहास (इंग्लिश भाषेत)
- बेल्जियममधील किल्ल्यांची यादी (इंग्लिश भाषेत)
संदर्भ
- ^ Puelinckx, Jean; Malchair, Luc. "Citadelle de Namur". Index des fortifications belges (French भाषेत). fortiff.be. 2017-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 August 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- सिटाडेले दे नामूर (फ्रेंच भाषेत)
- फॉर्टिफ.बे (फ्रेंच भाषेत) येथे नामूरचा किल्ला Archived 2017-07-31 at the Wayback Machine.