Jump to content

नमित दास

नमित दास (१० जुलै १९८४) हा एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन, रंगमंच अभिनेता आणि गायक आहे. त्याने अनेक दूरचित्रवाणी जाहिरातींमध्ये काम केले आहे. तो संगीतकार आणि गायकांच्या कुटुंबातील आहे; त्याचे वडील प्रसिद्ध गझल गायक चंदन दास आहेत. त्याचे आजोबा के. पन्नालाल यांनी दिल्ली आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी काम केले होते आणि ते प्रसिद्ध संगीतकार होते.

नमित दासने १५ फेब्रुवारी २०१५ रोजी त्याची दीर्घकाळची मैत्रीण श्रुती व्याससोबत लग्न केले. श्रुती स्वतः एक रंगमंच आणि चित्रपट अभिनेत्री आहे.