नभोनाट्य
नभोनाट्य हा आकाशवाणीसाठी लिहिलेल्या नाटकाचा एक प्रकार आहे. नभोनाट्यातून गंभीर, विनोदी, मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनपर विषय मांडले जातात. विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, शं.ना. नवरे यासारख्या अनेकांनी नभोनाट्ये लिहिलेली आहेत.
इतिहास
आकाशवाणीवर नभोनाट्याला इ.स. १९३६ पासून सुरुवात झाली.[१] त्या वर्षी बंगाली भाषेतील एका नाटकाच्या अनुवादाने भारतीय नभोनाट्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर भारतातील विविध भाषांमधील नभोनाट्ये प्रसारित करण्यात येऊ लागली.आकाशवाणीने नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम इ.स. १९५६ सालापासून सुरू केला. या कार्यक्रमातून भारतातील विविध भाषांतील नाटकांचे अनुवाद प्रसारीत केले जाऊ लागले. प्रा.मं.वि. राजाध्यक्ष यांनी या नाटकांना 'ऐकीव वा हवाई नाटके' तर पु.ल. देशपांडे यांनी नभोनाट्याला 'रेडिओ नाटक' असे संबोधले होते.
स्वरूप
नभोनाट्य हे साधारणत: ३० मिनिटांचे असते. दीर्घ नभोनाट्य हे ६० किंवा ९० मिनिटांचे असते. प्रसंग ज्याठिकाणी घडतो त्याचे हुबेहूब चित्र श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभे केले जाते. नभोनाट्य घरात बसून एकट्याने किंवा कुटुंबासमवेत ऐकता येते. वेगवेगळ्या वयोगटाचे श्रोतेही एकाच ठिकाणी बसून नभोनाट्य ऐकू शकतात.
कलाकार
बाळ कुडतरकर, नीलम प्रभू यांनी अनेक नभोनाट्ये सादर केलेली आहेत.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "नभोनाट्य". ३० सप्टेंबर, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "मनोगत ..मेरी आवाजही पहचान है..गर याद रहे..." ३० सप्टेंबर, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]