नदीमधील डॉल्फिन
नदीमधील डॉल्फिन हे फक्त दक्षिण आशियातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांमध्ये मिळतात. भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांत हे डॉल्फिन असतात. हे डॉल्फिन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या डॉल्फिनांसाठी बिहारमध्ये विक्रमशीला मरीन पार्क नावाचा प्रदेश राखीव ठेवला गेला आहे. इ.स. १९९८ पर्यंत ही एक प्राण्यांची वेगळी जात म्हणून ओळखली जात होती. पण १९९८ मध्ये हे डॉल्फिन आहेत असे जाहीर झाले. या डॉल्फिनांमध्ये मध्ये दोन जाती आहेत, गंगा डॉल्फिन आणि सिंधू डॉल्फिन. गंगा डॉल्फिन हे ब्रह्मपुत्रा, गंगा व त्यांच्या उपनद्यांमध्ये मिळतात. सिंधू डॉल्फिन हे सिंधूबरोबरच सतलज आणि बियास या नद्यांमध्येपण मिळतात. हा प्राणी भारताने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे.
संदर्भ आणि नोंदी
तरुण भारत मधील बातमी[permanent dead link]इंडियन एक्सप्रेस