नटराज
नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याचजोडीने संगीत शास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते.[१]
मूर्तीचे स्वरूप
या शिवमूर्तीला चार हात असून त्यांच्या चारही बाजू या अग्नीने वेढलेल्या आहेत. एका पायाखाली अपस्मार राक्षसाला दाबून ठेवलेले असून दुसरा पाय नृत्यमुद्रेत वर उचललेला आहे.[१] त्याच्या हातातील डमरू हे सृजनाचे प्रतीक तर अग्नी हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. या संसाराला आश्रय देण्याचे सामर्थ्य या मूर्तीतून दिसून येते. अज्ञान आणि दुष्ट प्रवृत्ती यावर पाय रोवून शिव नृत्य करीत आहे अशीही प्रतीकात्मकता यात दिसून येते.[२] चोळ राजवटीतील तांब्याची नटराज प्रतिमा ही इसवी सनाच्या दुस-या शतकातील आहे असे मानले जात असून त्यामध्ये शिवाची अभयमुद्रा आहे.[३]
तांडवाचा अर्थ
नटराज शिवाने केलेल्या तांडवातून सृष्टीची चक्राकार रचना आणि विनाश या दोन्हीचा आशय व्यक्त होतो असे मानले जाते.[२] पार्वतीचे लास्य नृत्य आणि शिवाचे रौद्र तांडव हे प्रकृती आणि परमात्मा यांच्या लीलांचे प्रतीक मानले जाते. [४]
वैज्ञानिक दृष्टीने
प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ फ्रिटोफ काप्रा यांनी शिवाच्या नटराजरूपाचा आणि अनुषंगाने त्याच्या तांडव नृत्याचा संबंध हा सृष्टीच्या उत्पती-स्थिती-लयाशी जोडत तो आपल्या अभ्यासातून वैश्विक ऊर्जेशी जोडलेला आहे. भौतिकशास्त्र विषयातील या भाष्याकडे भारतीय आणि परदेशी अभ्यासक संशोधनाच्या भूमिकेतून पाहतात हे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.[५]
शिल्पशास्त्रात
हिंदू शिल्पकलेचा विचार करता त्यामध्ये नटराज शिवाला विशेष महत्त्वाचे स्थान असलेले दिसते. दक्षिण भारतातील अनेक मंदिरात अशी शिल्पे आढळतात. चिदंबरम मंदिरात रौद्र आणि शांत अशा दोन्ही रूपातील नटराज नृत्य करतानाचे अंकन केलेले आहे. [२] [६]बदामी येथील लेण्यांमध्ये नृत्य मुद्रेतील शिव शिल्पाकृती दिसून येते. वेरूळ लेण्यांतही नटराज शिवाची शिल्पे दिसून येतात.[७]
हे सुद्धा पहा
- तांडवनृत्य
- अपस्मार (अवतार)
संदर्भ
- ^ a b Experts, Disha. Bharatiya Itihaas avum Kala Sanskriti IAS avum Rajaya Civil Sewa Samanya Adhyayan (हिंदी भाषेत). Disha Publications. ISBN 9789386320933.
- ^ a b c Singh, Upinder (2016). History of Ancient India (Hindi) (हिंदी भाषेत). Pearson India. ISBN 9789332584723.
- ^ Gokhale, Namita (2008-09). Shiv Mahima (Hindi) (हिंदी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780144001460.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Verma, Madhu (2009). Bharat Ke Nritya (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788185827452.
- ^ Ash, David A. (2007-09). The New Physics of Consciousness (इंग्रजी भाषेत). Kima Global Publishers. ISBN 9780980256123.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Coomaraswamy, Ananda Kentish (1924). The Dance of ?iva: Essays on Indian Art and Culture (इंग्रजी भाषेत). Courier Corporation. ISBN 9780486248172.
- ^ Tipare, Radhika (2018-01-04). VERUL LENYATIL SHILPAVAIBHAV. Mehta Publishing House. ISBN 9788177666335.