Jump to content

नगारा

नगारा हे प्राचीन काळातील एक प्रमुख वाद्य आहे. नगारा या वाद्याला ऐतिहासिक महत्त्व असून नगारा युद्ध , आराधना आणि संकट प्रसंगी स्वकियाना जागृत करण्यासाठी वापरले जाणारे एक ऐतिहासिक वादय आहे. नगारा हा वादय विशेषतः राजपुतानाशी अधिक निकटचा मानला जातो. गोर राजपुतशैलीचा नगारा हा विविध प्रसंगी वेगळ्या धूनमध्ये वाजवीण्यामागे विविध कारणे देखील मानली जाते. नगारा हे वादय होळी सणांच्या निमित्ताने, आनंदोत्सवाच्या निमित्ताने देखील वाजवीण्यात येतो. होळी आणि भजनाच्या प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये देखील नगाराचा वापर होतो. ड्रममधील जोड्या वेगवेगळ्या असतात, ज्यामध्ये एकाचा आवाज पातळ असतो आणि दुसऱ्याचा आवाज जाड असतो. ते वाजवण्यासाठी लाकडी दांडक्याने मारून आवाज काढला जातो. खालच्या पृष्ठभागावरील नागडा धातूपासून बनलेला असतो. हे भारतातील अतिशय लोकप्रिय वाद्य आहे.

राजस्थान मधील नगारे.

दोन काड्यांच्या सहाय्याने वाजविण्यात येणारे चर्मवाद्य.