नक्कल (लोककला)
नक्कल ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिची बोलण्याची ढब,आवाज,वैशिष्ट्यपूर्ण चालण्याची किंवा सवयीची नकलाकाराने अगदी तसाच अभिनय करून सादर केलेली व्यक्तिरेखा आहे.लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू, तुकडोजी महाराज,ग्रामिण भागातील व्यक्ति,भिकारी, आई, मास्तर,बावळट विद्यार्थी,शेजारी इत्यादी व्यक्तिरेखा नकलाकार सादर करीत असतात.अभिनयात जिवंतपणा यावा म्हणून ते त्या प्रकारची वेषभूषाही करीत असतात.