Jump to content

नकुल घाणेकर

नकुल घाणेकर
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गुरू सोनिया परचुरे
संगीत कारकीर्द
पेशा अभिनेते, नर्तक
कार्य संस्था डिफरन्ट स्ट्रोक्स डान्स ॲकॅडमी

नकुल घाणेकर हे एक मराठी अभिनेते व नर्तक आहेत. त्यांनी मिरजेच्या गांधर्व महाविद्यालयातून नृत्यालंकार ही पदवी मिळवली आहे. मराठी नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याकडून नकुल घाणेकर यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. सालसा हा नृत्यप्रकार त्यांनी सॅनफ्रॅन्सिस्को, सिंगापूर आणि मुंबई येथील प्रशिक्षकांकडून आत्मसात केला आहे. कथ्थक या शास्त्रीय नृत्याची आवड आणि नंतर त्यात केलेले कारकीर्द, त्याचसोबत नृत्य प्रशिक्षण देणे, सालसा-कथ्थकचे फ्यूजन सादर करण्याबरोबरच संधी मिळेल तेव्हा अभिनयाची झलक दाखविणे अशी एका वेळी अनेक व्यवधाने सांभाळत त्यांची वाटचाल चालू आहे. नकुल घाणेकर मुंबई जवळच्या ठाणे शहरात डिफरन्ट स्ट्रोक्स डान्स ॲकॅडमी चालवतात. या संस्थेत ते लॅटिन बॉलरूम, सालसा, बचाटा आदी नृत्यप्रकार शिकवतात.

अभिनय

  • नकुल घाणेकर यांनी ’संघर्ष’ या मराठी चित्रपटात भूमिका केली आहे. चित्रपटात प्राजक्ता माळी ही नकुल घाणेकरची प्रेयसी आहे.
  • त्याशिवाय 'प्रतिबिंब', आणि ’सामर्थ्य’ या चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे.
  • झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील 'अजूनही चांदरात आहे' या मालिकेमध्ये नकुल घाणेकर याची भूमिका होती.
  • झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'जय मल्हार' मध्ये हेगडी प्रधानांची भूमिका करणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने, त्यांची भूमिका नकुल घाणेकर यांना साकारावी लागली आहे. (जानेवारी २०१५).