Jump to content

नकारात्मक स्वातंत्र्य

नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नवउदारमतवाद या दोन विचारप्रणालीमधून उदयास आली आहे.जॉन स्टुअर्ट मिल,इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक,रॉबर्ट नोझिक या विचारवंताच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य वरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. राज्यसंस्था, सामाजिक, आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते. व्यक्तिस्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते. यासाठीच धाक,दहशत, जबरदस्ती, राज्यसंस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते.[]

  1. ^ Silier, Yildiz (2017-11-28). Freedom: Political, Metaphysical, Negative and Positive. Routledge. pp. 42–56. ISBN 978-1-351-15800-8.