Jump to content

नंदकिशोर बल

नंदकिशोर बल (२२ डिसेंबर, इ.स. १८७५ - १ जुलै, इ.स. १९२८) हे उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार होते. पल्लीकबी - अर्थात "खेड्यापाड्यांचा कवी" - या नावाने यांना संबोधले जाते. यांनी शंभराहून अधिक सुनीते लिहिली.

प्रकाशित साहित्य

नंदकिशोर बल यांनी लिहिलेल्या कविता निर्झरिणी, पल्लीचित्र, बसंतकोकिला, तरंगिणी, चारुचित्र, निर्माल्य, प्रभातसंगीत, संध्यासंगीत, कृष्णकुमारी', शर्मिष्ठा या काव्यसंग्रहातून प्रकाशित झाल्या आहेत.

कनकलता या नावाची कादंबरीही त्यांनी लिहिली. इ.स. १९२५ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीत संरंजामवादी ग्रामीण समाजव्यवस्थेत भिनलेल्या हुंडापद्धतीचे दुष्परिणाम आणि बालविधवांच्या हालअपेष्टांचे चित्रण आहे.

साहित्यकृतीचे नावप्रकाशनवर्ष (इ.स.)साहित्यप्रकारभाषा
पल्लीचित्रइ.स. १८९८ []काव्यसंग्रहउडिया
निर्झरिणीइ.स. १९००[]काव्यसंग्रहउडिया
चारुचित्रइ.स. १९०२[]काव्यसंग्रहउडिया

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c दास, शिशिरकुमार. अ हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर : १८००-१९१० वेस्टर्न इंपेक्ट : इंडियन रिस्पॉन्स (इंग्लिश भाषेत). p. ३२६.CS1 maint: unrecognized language (link)