धौली प्रस्तरलेख
धौली प्रस्तरलेख हा सम्राट अशोकाने निर्मिलेला एक शिलालेख किंवा प्रस्तरलेख आहे. हा प्रस्तरलेख सम्राट अशोकाने कलिंगचे युद्धानंतर त्याबद्दलचे याचे प्रस्तरलेख लोकवस्तीपासून जवळ, व्यापारी मार्ग आणि तीर्थस्थाने यांच्या नजीक कोरवले. त्यांपैकीच हा एक होय.
भौगोलिक स्थान
ओडिसा राज्यात पुरी जिल्ह्यातील खुर्दा तालुक्यात हे गाव आहे. भुवनेश्वर पासून दक्षिणेस ते ११.२ कि.मी अंतरावर दया नदीच्या किनारी आहे. इ.स. १८३७ मध्ये लेफ़्टनंट किट्टू यांने हे लेख शोधून काढले.हे लेख एका मोठ्या शिळेवर असून आसपास १०-१५ कि.मी.च्या परिसरात तेथे कोणताही डोंगर नाही. प्रसिद्ध असे कलिंग युद्ध येथे झाले असे गृहीत धरले जाते.[१]
लेखाचे वैशिष्ट्य
या शिळेवर लेख संपल्यावर उजवीकडे १.२ मी उंचीचा हत्तीचा दर्शनी भाग मोठ्या सुबकपणे काढलेला आहे जो ओरिसातील प्राचीन बौद्ध शिल्पांपैकी एक मानला जातो.या शिलालेखाचे गिरनार येथील लेखाशी साम्य आहे. येथे अकरा, बारा, तेरा हे लेख यावरील अभ्यासपूर्ण लेख अस्तित्वात नाहीत परंतु चौदाव्या लेखानंतर दोन वेगळे लेख येथे आहेत आर्कीओलोजिकल सर्व्हे ऑफ सदर्न इंडिया खंड १– पृ.११४ मध्ये प्रसिद्ध केला.[२]
स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व
सम्राट अशोकाच्या मनातील ही एक हळवी आणि भावनिक अशी जागा मानली जाते कारण कलिंगचे प्रसिद्ध युद्ध येथेच झाले. दया नदीचे पाणी युद्धाच्या रक्तपाताने लाल झाले होते असेही मानले जाते.या सर्वाचा अशोकाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्याने अहिंसेचे तत्त्व स्वीकारले असे मानले जाते. त्यामुळे हे स्थान बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र असावे असा विचार अशोकाने केला. त्याने या ठिकाणी अनेक चैत्य, स्तूप आणि स्तंभ उभारले. त्यावर त्याने आपल्या राजाज्ञा, प्रजेसाठी नियम, शासन व्यवस्था, दंडनीती, दानाचे महत्त्व असे विषय कोरले ज्यामुळे त्याच्या नव्या साम्राज्यात या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
स्तूप
या धौली पर्वतावर एक झळाळता शुभ्र पांढरा स्तूप आहे, जो इ.स. १९७० मध्ये कलिंग निप्पोन बुद्ध संघ यांच्यातर्फे उभारला गेला आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ http://www.indiavideo.org/text/maurya-dynasty-kalinga-war-ashoka-49.php Kalinga War and its impact on Ashoks>
- ^ डॉ. गोखले शोभना, पुराभि'लेखविद्या (१९७५)