Jump to content

धोला सदिया पूल

ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पूल

धोला-सदिया पूल हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला पूल भारतातील सर्वात लांब पूल आहे. सुमारे सव्वानऊ किलोमीटर (नेमके ९.१५ किलोमीटर (५.६९ मैल)) लांबीच्या या पुलाची वजन पेलण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे हा पूल नागरिकांसोबत लष्करालाही वापरता येतो. हा पूल मुंबईतील बांद्रा-वरळी सीलिंकपेक्षा ३.५ किलोमीटर (२.२ मैल) लांब आहे. चीनच्या सीमेजवळ पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याच्या उद्देशाने या पुलाची निर्मिती झाली. चीनच्या सीमेपासून हा पूल १०० किमी दूर आहे. या धोला-सदिया पुलाच्या बांधकामाला इ.स. २०११मध्ये सुरुवात झाली आणि त्याचे उद्‌घाटन २६ मे इ.स. २०१७ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुलाच्या बांधकामाची अंदाजपत्रकाप्रमाणे किंमत ९५० कोटी रुपये होती [१]परंतु प्रत्यक्षात झालेला खर्च २०५६ कोटी रुपये आहे.[२] जो बांद्रा-वरळी सीलिंकच्या १६०० कोटी पेक्षा अधिक आहे. हा पूल आसामची राजधानी दिसपूरपासून ५४० किमी तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. एकही नागरी विमानतळ नसलेल्या अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांना या पुलामुळे दिब्रूगढ विमानतळावर सहजपणे पोचणे शक्य झाले.

पुलाची वैशिष्ट्ये

  • या पुलास १८२ खांब/स्तंभ आहेत.
  • हा पूल ६० रणगाड्यांचे वजन पेलू शकतो.
  • पुलाची रुंदी ४२ फूट आणि लांबी ३०,३५० फूट.
  • ब्रह्मपुत्र नदीतून धोला ते सदिया हे अंतर कापण्यास साडेचार तास लागत. पुलावरून ते अंतर अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात पार करता येते.आसाम ते अरुणाचल प्रदेश मधील अंतर सुमारे १६५ किमी.ने कमी झाले.
  • दररोज सुमारे १० लाख रुपयांच्या इंधनाची बचत.

संदर्भ आणि नोंदी