Jump to content

धोराजी

धोराजी हे भारतातील गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ८४,५४५ होती.

येथे असलेला किल्ला १७५५मध्ये बांधला गेला. या किल्ल्याला चार मोठे आणि तीन छोटे दरवाजे आहेत.

धोराजी रेल्वे स्थानक वांसजाळिया-जेतलसर मार्गावर असून पोरबंदर, राजकोट आणि अहमदाबादशी जोडलेले आहे.