Jump to content

धोम

धोम महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. येथे जवळ कृष्णा नदीवर बांधलेले मोठे धोम धरण आहे.

हवामान

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.