Jump to content

धोबी


परीट (किंवा धोबी) हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. एकूण बलुतेदारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुतेदारांत गणला जातो. ह्यांचा धर्म हिंदू असून ह्या समाजात खंडोबा, मरीआई, येडाबाई, भवानी देवी, भैरोबा, म्हसोबा या दैवतांची पूजा मोठ्या प्रमाणात होते. परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. परीट समाज हा आक्रमक क्षत्रिय लढवय्या व रांगडा समाज आहे. हिंदू वर्णव्यवस्थेत यांना खालच मानले जात असे . कुस्ती खेळण्यात हा समाज पटाईत होता. धोबीपछाड हा डाव परिटानीच शोधला आहे. घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषतः कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या वा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती .