Jump to content

धोतर

धोतर नेसलेल्या आणि अंगावर कांबळे पांघरलेल्या मराठा सैनिकाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८०८ - इ.स. १८१२ अंदाजे; चित्रकार: फ्रांस्वा बाल्थाझार सोल्विन्स)

धोतर हा भारतीय पुरुषांचा पारंपारिक वस्त्रप्रकार आहे. हा वस्त्रप्रकार भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव भारतीय उपखंडाबाहेर आग्नेय आशियातील थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, तसेच आफ्रिकन देशांमध्ये काही प्रमाणात प्रचलित आहे.

धोतर म्हणजे चौकोनी आकाराचे, सुमारे ४.५ मीटर लांबीचे, सहसा सुती किंवा रेशमी कापड असते. कमरेवरून व पायांवरून लपेटून घेऊन, गाठ मारून कमरेपाशी बांधून ते नेसले जाते.

आज नागरी भागामध्ये धोतराचा वापर कमी झाला आहे. पण ग्रामीण व अर्धनागरी भागात अजूनही धोतराचा वापर केला जातो. हिंदू धर्मातील पौरोहित्य करणारे ब्राह्मण धोतराचा वापर करताना दिसतात.

नेसण्याच्या पद्धती

  • एकटांगी
  • दुटांगी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "धोतर कसे नेसावे ?".