धूळपाटी/हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील ताराबाई परांजपे यांचे धाडसी कार्य
हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील ताराबाई परांजपे यांचे धाडसी कार्य
डॉ.ताराबाई परांजपे यांचा जन्म आंध्रप्रदेशात वरंगल येथे ५ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांपैकी ताराबाई परांजपे या एक कार्यकर्त्या होत्या. केवळ कार्यकर्त्याच नव्हे तर , या कार्याला ताराबाई यांचे कार्य अत्यंत चौफेर असे आहे. अनेक धाडसी कामे या लढ्यात त्यांनी केली आहेत. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ताराबाई वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी काम करू लागल्या. यातूनच सेवादलाच्या वाटचलीकडे आकर्षित झाल्या. तसेच १९४५ मध्ये त्या सेवादलाच्या प्रमुख महिला संघटक बनल्या, तर त्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या होत्या. तसेच त्यांनी समाजात अनेक कार्य केले. (१). निधी वसूल करणे. (२). गट सभा घेणे. (३). सत्याग्रहाची व्यवस्था करणे. (४) पत्रके काढणे आणि वाटणे. तसेच त्यांनी सेवडलात असताना त्यांनी मुलींच्या ४-५ शाखा चालवल्या तसेच पुष्कळ मुली सेवादलात होत्या. तेथील ताराबाई वसुलीसाठी कोठी विभागात मागील गल्लीतून फिरत होत्या तसेच तेथील सारी वस्ती तेलुगू होती.भाषिक हिंदू असा समाज होता. अशाच एका घरात ताराबाई गेल्या. त्यांच्या दाराशी रांगोळी होती, दारावर पडदाही नव्हता इतर हिंदू घरासारखे ते घर होते. त्यामुळे त्या बिनधास्तपणे त्या घरात शिरल्या समोर दोन तरुण व एक म्हातारा होता. स्त्रियांपैकी कोणीच नव्हते. ताराबाई गेल्या खुर्चीवर बसल्या निजामाचे राज्य जुलमी आहे असे बोलू लागले. हे ऐकताच लोक चिडले व त्यातील एक जण ओरडला बंद कर म्हणाला ताराबाई घाबरल्या निजामी राज्यात एका हिंदू तरुणीने मुस्लिम घरात शिरून निजमाविरूद्ध बोलायचे म्हणजे वाघाच्या गुहेत शेळीने शिरण्यासारखेच आहे आणि ताराबाईने तेच केलं, पण असे कोण जाणे त्या म्हाताऱ्या मानसातला परमेश्र्वर जागा झाला. तो पटकन उठून म्हणाला," बेटी निकाल जा यहां से". ताराबाई त्यांच्या आधाराने दारापर्यंत पोहोचल्या आणि दाराबाहेर पडून एका शेजारच्या घरात दडून बसल्या. ज्यावेळी आंदोलनाची तीव्रता वाढली तेव्हा विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. तसेच ५०-६० विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या तेव्हा मुख्याध्यापकांनी शाळेच्या फाटकाला कुलूप लावले आणि मुळणीचा मोर्च्यात जाण्याचा मार्ग रोखून धरला, पण मुली कंपाउंडच्या भितिवरून उड्या मारून मोर्च्यात सहभागी झाल्या. अशाच वेगवेगळ्या कार्यातून ताराबाईचे संघटन कौशल्य पणाला लागत. स्वतंत्रच ध्येयाने प्रेरीत ताराबाई अनेक अशाच प्रसंगाना सामोरे गेल्या. त्यापैकी चक्रमुद्रन यंत्राची सोडवणूक हे धाडसी काम ताराबाई व त्यांचे सहकारी पद्माकर लाटकर यांनी केले. अशाप्रकारे या स्वातंत्र्य संग्रामात ताराबाईंची मोलाची कामगिरी होती. अशाप्रकारे ताराबाई परांजपे यांनी वयाच्या अगदी लहानपणापासूनच स्वातंत्र्याच्या कार्यासाठी प्रेरित होऊन हैद्राबाद मुक्ती संग्रामात मोलाचे योगदान दिले.
संदर्भ:- भाले राम,कोरान्ने शोभा,देशपांडे वृंदा,धारूरकर शुभदा,कोरान्ने आशा ( संपा ), ( २०१२ ), हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पूर्ण वेळ कार्यकर्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद ,प्रथम आवृत्ती पृ.१८०,१८१,१८२,१८३,१८४