धूळपाटी/शिकारी-संकलकांचे समाज
असे समजले जायचे की शिकार-संकलनाच्या जागी नवाश्म युगाच्या क्रांतीतून शेती आणि पशुपालन आल्यावर मानवाचे जीवनमान उंचावले. शिकारी संकलकांचे आयुष्य अनिश्चित, कठीण आणी अल्पावधीचे होते आणि त्यांना पोट भरण्यासाठी खूप राबायला लागायचे. अर्व्हेन डे व्होर यांच्या अभ्यासातून या समजांना आव्हान दिले गेले. विशेषतः दक्षिणा आफ्रिकेतील कालाहारी वाळवंटातील शिकारी-संकलकांचा अन्नपुरवठा सातत्याने उपलब्ध होता आणि त्यांच्या जीवन शैलीत भरपूर आराम मिळायचा असे दिसून आले. आज अनेकांच्या मते शिकारी समाज हेच मूळचे समृद्ध समाज होते.
तीन लक्ष वर्षांपूर्वी उगम पावलेली आपली होमो सापिएन्स मानवजात एकवीस हजार वर्षांपूर्वी पर्यंत शिकार- संकलन करत जगत होती. २१,००० वर्षांपूर्वी जग इतके गारठले की त्यांची ही जीवन शैली चालू ठेवणे अवघड झाले. मग हळूहळू शिकारी संकलक समाज पशूंना माणसाळवत आणि वनस्पतींची लागवड करत आपली जीवनशैली बदलू लागले. १५,००० वर्षांपूर्वी लांडग्यांतून (Canis lupus) कुत्रे (Canis lupus familiaris) उपजले. त्यांच्या पाठोपाठ ११,००० वर्षांपूर्वी बकऱ्या, डुकरे मेंढ्या आणि सपाट पाठीचे उंट माणसाळवले गेले. ११,५०० वर्षांपूर्वी गहू, बार्ली, वाटाणा, मसूर, हरभरा, आणि जवस लागवडीखाली आणले गेले. शेती - पशुपालनाबरोबर लोकसंख्या वाढू लागली आणि ते शिकारी - संग्राकलकांच्या टापूंवर आक्रमण करून त्यांना हुसकावू लागले.[१]
- ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.