Jump to content

धूळपाटी/भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते

{

जिया खान

मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट व नटी अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे. ४० वर्ष किंवा यापेक्षा कमी आयुष्य लाभलेल्या अभिनेत्रींचा आणि आणि अभिनेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यादी

  • जयराम हर्डीकर : मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेता. ५ एप्रिल १९८० मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर नाटकाच्या बस‍ला आग लागल्याने जळून मरण.
  • शंकर नाग : १९९० मध्ये कार अपघातात निधन.
  • अरुण सरनाईक : १९८४ मध्ये "पंढरीची वारी" ह्या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या चित्रीकरणासाठी कोल्हापूरहून पुण्याला जाताना टॅक्सीच्या अपघातात.
  • अक्षय विनायक पेंडसे : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ३५व्या वर्षी अपघाती निधन.
  • गीता बाली : हिंदी चित्रपट अभिनेत्री. कांजण्या आल्याने वयाच्या ३५व्या वर्षी (२१ जानेवारी १९६५ रोजी) निधन.
  • गीता दत्त : हिंदी-बंगाली चित्रपटांतील पार्श्वगायिका. २० जुलै १९७२ रोजी, वयाच्या ४१व्या वर्षी, यकृतविकाराने मृत्यू.
  • गुरुदत्त : हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक. वयाच्या ३९व्या वर्षी (१० ऑक्टोबर १९६४ रोजी) आत्महत्या.
  • जसपाल भट्टी : २०१२साली हा विनोदी अभिनेता कार‍ अपघातात ठार झाला.
  • जिया खान : हिंदी आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री. २५व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या (३ जून २०१३ रोजी).
  • तरुणी सचदेव : रचना गर्ल म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री, नेपाळमधे झालेल्या विमान अपघातात मरण पावली.
  • दिव्या भारती : हिंदी चित्रपट अभिनेत्री. हिने वयाच्या १९व्या वर्षी (५ एप्रिल १९९३ रोजी) आत्महत्या केली (किंवा तिचा खून झाला).
  • दीनानाथ मंगेशकर : मराठी नाट्यसृष्टीतील गायक-नट, नाट्य दिग्दर्शक, निर्माते. अति मद्यसेवनाने आणि दारिद्र्याने अकाली निधन, वयाच्या ४१व्या वर्षी (२४ एप्रिल १९४२ रोजी).
  • मधुबाला : हिंदी चित्रपट अभिनेत्री. रक्ताच्या कर्करोगाने अकाली निधन. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ फेब्रुवारी १९६९ रोजी).
  • मनमोहन देसाई : हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १ मार्च १९९४ रोजी आत्महत्या.
  • मीना कुमारी : हिंदी चित्रपट अभिनेत्री. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ३९व्या वर्षी (३१ मार्च १९७२ रोजी).
  • मुग्धा चिटणीस : 'माझं घर माझा संसार' - एकमेव मराठी चित्रपट केलेली अभिनेत्री वयाच्या ३१व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. (१० एप्रिल १९९६)
  • रीना रावत : गढवाली अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने ३८व्या वर्षी मृत्यू. (१२ मार्च २०२०). त्या उत्तराखंडातील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका होत्या.
  • सतीश दुभाषी : मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेता. वयाच्या ४१व्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर नाटकाच्या बस‍ला आग लागल्याने जळून मरण (१२ सप्टेंबर १९८० रोजी).
  • सिल्क स्मिता : दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ सप्टेंबर १९९६ रोजी) आत्महत्या.
  • स्मिता पाटील : मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. वयाच्या ३१व्या वर्षी (१३ डिसेंबर १९८६ रोजी) बाळंतपणात निधन.
  • सौंदर्या : दक्षिणी भारतीय नटी. २००४मध्ये एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. उड्डाण होताच काही मिनिटांतच विमानाला आग लागली आणि त्यानंतर ते खाली कोसळले. या अपघातात ३१ वर्षीय सौंदर्याचा मृत्यू झाला.
  • सुशांत सिंह राजपूत : हिंदी चित्रपट अभिनेता. वयाच्या ३४व्या वर्षी आत्महत्या.

रंगमंचावर मरण आलेले अन्य कलावंत

  • वि. वा. शिरवाडकर लिखित आणि ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ची निर्मिती असलेल्या ‘नटसम्राट’ नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेंबर १९७० या दिवशी मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात सादर झाला. नाटकात ‘विठोबा’ ही भूमिका करणारे कलावंत बाबूराव सावंत यांनाही नाटकाचा प्रयोग सुरू असताना मरण आले होते. ‘नटसम्राट’च्या तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशाच्या वेळी सावंत यांच्या संवादानंतर डॉ. श्रीराम लागू यांचे नाटकातील शेवटचे स्वगत सुरू होते आणि त्या स्वगतावर नाटकाचा शेवट होऊन पडदा पडतो. त्या वेळी नाटकाचा पडदा पडता पडता इकडे आतमध्ये सावंत खाली कोसळले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा रंगमंचावरच मृत्यू झाला.
  • नाटककार व अभिनेते नागेश जोशी, शंकर घाणेकर, राजा गोसावी, शाहीर विठ्ठल उमप आदी कलाकारांनाही अशाच प्रकारे मृत्यूने गाठले होते. ‘देवमाणूस’ नाटकाचे लेखक व नाटकातील प्रमुख भूमिकेत असलेले नागेश जोशी यांना एका प्रयोगाच्या वेळी असे मरण आले, तर अभिनेते शंकर घाणेकर यांनीही कोकणातील एका प्रयोगाच्या वेळी अखेरचा श्वास घेतला. ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाचा प्रयोग मुंबईत दीनानाथ नाटय़गृहात होता. राजा गोसावी रंगभूषा करून तयार होते. प्रयोग सुरू होण्यापूर्वी रंगपटातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता.
  • शाहीर विठ्ठल उमप यांचे नागपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व्यासपीठावर ते कार्यक्रम सादर करत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यांचे निधन झाले.


चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असलेल्या पण अल्पायुषी ठरलेल्या काही अन्य व्यक्ती
  • गुलशनकुमार : चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ४८व्या वर्षी (१२ ऑगस्ट १९९७) मृत्यू.
  • ब्रिज सदाना ऊर्फ ब्रिजमोहन : हिंदी चित्रपट दिग्‍दर्शक : पत्नीला, स्वतःच्या मुलाला, आणि स्वतःला गोळी मारल्याने सर्वांचे मरण. वयाच्या ५७व्या वर्षी (२१ ऑक्टोबर १९९० रोजी).
  • वर्षा भोसले : गायिका. आत्महत्या.
  • सुरेश अलूरकर : हिंदी-मराठी चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ५९व्या वर्षी (१४ डिसेंबर २००८) मृत्यू.

हे सुद्धा पहा