धूळपाटी/बाबासाहेब आंबेडकर/प्रस्तावित बदल-२०२३
हे पान मराठी विकिपीडियावरील बाबासाहेब आंबेडकर या लेखात बदल सुचविण्यासाठी तयार केलेले आहे. कृपया प्रत्येक बदल सुचवताना मूळ उतारा आणि त्याचे नवीन स्वरूप असे दोन्ही लिहावेत आणि खालील संपादकांना हाक द्यावी --
- सदस्य चर्चा:अभय नातू
- सदस्य चर्चा:संतोष गोरे
- सदस्य चर्चा:संदेश हिवाळे
- सदस्य चर्चा:Akshaypatill
- सदस्य चर्चा:Tiven2240
थेट लेखात बदल केल्यास ते उलटविले जाण्याची दाट शक्यता आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०२:०१, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)
प्रस्तावित बदलाचे उदाहरण --
बदल १
- विभाग -- सुरुवातीचे जीवन/पूर्वज
- प्रस्तावक -- सदस्य चर्चा:अभय नातू
- कारण -- पुनरावृत्ती
- मूळ उतारा किंवा भाग --
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले.
- प्रस्तावित बदल --
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे ते सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले.
बदल २
- विभाग -- सुरुवातीचे जीवन/पूर्वज
- प्रस्तावक -- सदस्य चर्चा:Akshaypatill
- कारण -- लेख बाबासाहेबांबद्दल आहे. रामजींबद्दल नाही.
- मूळ उतारा किंवा भाग --
खाली पहा
- प्रस्तावित बदल --
- चर्चा
- पाठिंबा- कारण पटते. - अभय नातू
- टिप्पणी - १)कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी, भीमाबाईंच्या वडिलांविषयीची माहिती लेखात असणे आवश्यक वाटते, जी एकाच ओळीत आहे. (२) रामजींची माहिती असणाऱ्या सुमारे ९ ओळी आहेत. त्यात सांगितलेली रामजींची कारकीर्द एक-दोन ओळींमध्ये मांडता येईल असे पुनर्लेखन करायला हवे. महत्त्वाचे हे की नोकरीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये/बाबासाहेबांच्या जन्मावेळी रामजी कोणत्या पदावर होते हेही लेखात असणे आवश्यक आहे. रामजींची सरसकट माहिती काढणे आंबेडकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी उचित राहणार नाही. ३) लेखातील माहिती काढणे आणि आवश्यकता असेल ती योग्य लेखात हलवने सुद्धा गरजेचे आहे. उदाहरणार्थ - या लेखातून रामजींची माहिती काढली तर रामजींच्या स्वतंत्र लेखात ती हलवली जावी. (ही माहिती रामजींच्या लेखामध्ये असावी, हे केवळ उदाहरण आहे). - संदेश हिवाळे
- झाले. वरील नोंदीची दखल घेत काही मजकूर ठेवून उरलेला खोडला आहे. हा मजकूर रामजी सकपाळ लेखात आधीपासूनच होता. -- अभय नातू (चर्चा) ०८:०१, २५ नोव्हेंबर २०२३ (IST)
बदल ३
- विभाग -- उच्च शिक्षण
- प्रस्तावक -- सदस्य चर्चा:Akshaypatill
- कारण --
लेखामध्ये आंबेडकरांना भारतातील 'सर्वात प्रतिभाशाली ' आणि ' सर्वात उच्चविद्याविभूषित ' असे संबोधले आहे आणि एका tribute म्हणून लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. प्रश्न असा आहे की, ' सर्वात प्रतिभावान ' ची व्याख्या काय? नेहरू, गांधी, पटेल हे प्रतिभावान नव्हते का? असाच प्रश्न ' देशातील सर्वात उच्चविद्याविभूषित' साठी आहे. यासाठी कोणतं देशव्यापी सर्वेक्षण घेण्यात आलं होत का? यासाठी एखाद्या इतिहासकाराने लिहिलेल्या संदर्भाची आवश्यकता आहे. -- Akshay«चर्चा» १५:५१, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)
- विरोध- "प्रतिभावान" आणि "उच्चविद्याविभूषित" ह्या बाबी योग्यतेने सिद्ध होत असतात, एखाद्या देशव्यापी सर्वेक्षणाने नव्हे. सर्वेक्षणांमधून व्यकींची महानता आणि लोकप्रियता तपासली जाते (२०१२ मध्ये तसे झाले आहे). "उच्चविद्याविभूषित" म्हणजेच "उच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती" असा या शब्दाचा साधा अर्थ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत अमेरिका आणि इंग्लंड येथील शिक्षण संस्थेतून BA, MA (2), PHD, MSc, DSc, barrister-at-law या (मास्टर्स आणि डॉक्टरेट) पदव्या मिळवल्या आहेत. (त्यांना LLD व DLit सारख्या मानद डॉक्टरेट सुद्धा मिळाल्या.) त्यांच्या हयातीत त्यांच्या एवढ्या पदव्या भारतातील दुसऱ्या कोणी व्यक्तीने मिळवल्या नाहीत, म्हणून ते "सर्वात जास्त उच्चविद्याविभूषित" ठरतात. ज्ञानशाखेतील विविध विषयांचा सखोल अभ्यास, प्रचंड वाचन आणि शैक्षणिक योग्यता यांनुसार त्यांना त्यांच्या काळातील सर्वात प्रतिभावान/हुशार व्यक्ती मानले जाते. (याखेरीज ते त्यांच्या काळातील संभवतः जगातील सर्वात जास्त शिकलेले राजकारणी होते.) त्यामुळे "प्रतिभावान" आणि "उच्चविद्याविभूषित" ह्या दोन्ही बाबी लेखातून हटवण्यायोग्य ठरत नाहीत.. - संदेश हिवाळे
- विरोध- मला असे वाटले होते की, सन्माननीय सदस्य हे लेख सुधरण्यासाठी आले आहेत, प्रत्येक विधान उडवणे आणि मराठी विपी ची परीक्षा घेण्यासाठी नाहीत. "सर्वात जास्त उच्चविद्याविभूषित" व "सर्वात प्रतिभाशाली" - कृपया तुम्हीच नेहरू, गांधी, पटेल यांच्या शैक्षणिक पदव्या तसेच इतर उपाधी यांची यादी प्रथम येथे मांडून ते कसे 'सर्वात जास्त उच्चविद्याविभूषित' आणि 'सर्वात प्रतिभाशाली' होते याशिवाय त्या काळी कोणकोणते विविध देशव्यापी सर्वेक्षण घेण्यात आले होते याची अधिकृत सरकारी संकेतस्थळावरील यादी येथे पोस्ट करावी, म्हणजे मग त्यानुसार लेखात बदल करता येतील. आणि हो, येथे आपण शालेय किंवा महाविद्यालयीन मंडळाचा अभ्यासक्रम ठरवत नाहीत, की ज्यासाठी फक्त नोंदणीकृत इतिहासकारांचेच अधिकृत दाखले विचारत घेतले जातील. संदेश यांचे मत योग्य वाटते. बाकी निर्णय बहुमताने आणि मराठी विपीच्या पूर्वापार लेखन शैलीला अनुसरून घ्यावा.. - संतोष गोरे
- टिप्पणी - @संतोष गोरे:, आपल्या मताचा पूर्ण आदर करुनच एक नम्र विनंती/सूचना - कृपया प्रत्येक प्रस्तावित बदलावर मत द्यावे. व्यक्तिवर टिप्पणी नको! तुम्ही असे कधीच केलेले नाहीत म्हणून थोडेसे आश्चर्य वाटते. असो. पुन्हा एकदा, ही केवळ एक नम्र विनंती आहे.. - अभय नातू
- टिप्पणी - @संतोष गोरे:. तुम्हाला किंवा मला काय वाटते याचा संबंध येत नाही. यासाठी एक विश्वासू इतिहासकाराने लिहिलेला संदर्भ माझ्या तोंडावर फेकून मारा आणि मी येथे ब्र ही काढणार नाही. एका हिंदीच्या प्राध्यापकाने लिहिलेले पुस्तक इतिहासाचा संदर्भ म्हणून देणे चालणार नाही. असं संदर्भ नसेल तर हे वाक्य काढून टाकले जाईल. कृपया चर्चा:बाबासाहेब_आंबेडकर#महत्वाच्या_Wiki_Policies_आणि_guidelines. वाचून घ्यावे.
- तसेच, तुम्ही कृपया en:Wikipedia:No original research हेही वाचून घ्यावे. विकिपीडियावर ऐतिहासिक विषयांवर लिहिताना लिहिताना इतिहासकारांचेच अधिकृत दाखलेच घ्यायचे आहेत. स्पष्ट लिहिलंय Wikipedia is fundamentally built on research that has been collected and organized from reliable sources, as described in content policies such as this one. मी महत्वाच्या content policies चर्चा पानावर लिहिल्या आहेत. त्यामुळे तुमचे मुद्दे इथे वैध नाहीत.
- मुद्दा अधिक स्पष्ट करतो, की आंबेडकर प्रतिभावान आणि उच्चविद्याविभूषित होते यात शंका नाही, पण ते "भारतातील सर्वात" जास्त होते का हा मुद्दा आहे, आणि त्यासाठी विश्वासू संदर्भ लागेल .. - Akshaypatill
- टिप्पणी - इतिहासकाराच्या मताला पहिले प्राधान्य आहे. पण जर इतिहासकाराने मत दिले नाही तर आपण दुसरा कोणाचा संदर्भ जोडायचा नाही, असे आहे का? अशावेळी वर्तमान काळातला कोणत्याही पुस्तकातला/संकेत स्थळावरचा संदर्भ चालतो. सदरील लेखाला इंग्रजी विकिपीडियाच्या दृष्टिकोनातून बघणे टाळावे! जोडलेल्या संदर्भांना अवैध - अविश्वसनीय ठरवायचे आणि दुसऱ्यांकडून वैध व विश्वसनीय संदर्भांची मागणी करायची!! असे करू नका! लेखात तुम्ही सुधारणा करताय ना तर तुम्हाला जो संदर्भ वैध वाटतोय तो तुम्ही स्वतः शोधून वापरावा. शंभर पेक्षा जास्त आंबेडकर चरित्रे उपलब्ध आहेत, वापरा. हट्टीपणा सोडावा आणि प्रचालकांनी ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार बदल करावा ही पुन्हा एकदा नम्र विनंती.
- आपल्या हयातीत बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील सर्वात जास्त प्रतिभावान आणि सर्वात जास्त उच्चविद्याविभूषित होते हा मुद्दा तुम्हीच विश्वासू संदर्भ देऊन खोडून काढावा. यासाठी सरळ सरळ एकच करा, बाबासाहेबांपेक्षा जास्त पदव्या ज्यांनी मिळवल्या असतील त्यांची नावे येथे सादर करा.. - संदेश हिवाळे
बदल ४
विभाग: वैयक्तिक जीवन
आंबेडकर आपल्या बायकोला कोणत्या नावाने हाक मारत, याची माहिती काढून टाकली आहे. ही रोजनिशी नसून, विशिष्ट नियमांना अनुसरून लिहिलेला विश्वकोश आहे. -- Akshay«चर्चा» १७:१३, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)
- चर्चा
- टिप्पणी - हा लेख बदल करण्यासाठीचे प्रस्ताव मांडण्यासाठी आहे, केलेले बदल घोषित करण्यासाठी नाही. यानंतर बदल करण्यासाठी आपण योग्य प्रक्रियेचा वापर कराल ही अपेक्षा. - संदेश हिवाळे
- विरोध- माहिती काढून टाकली आहे???? कुणी, कधी आणि कुठे याची चर्चा केलीय, कुणी, कधी आणि कुठे याचा निर्णय घेतला? . - संतोष गोरे
- पाठिंबा- दिलेले कारण पटते. माहिती काढली हे बरोबर कि नाही यावर सध्या माझे मत नाही. - अभय नातू
- टिप्पणी - मी आधीच स्पष्ट केलं आहे, की मी प्रत्येक लहानसहान गोष्टीवर चर्चा करणार नाही. मी अनेक विकिपीडिया Policies कोट केल्या आहेत आणि विकीपेडियावर त्यांना धरूनच लेख लिहायचे आहेत. मला किंवा तुम्हाला काय वाटते, याचा काडीचा उपयोग नाही. विश्वासू, तटस्थ, वैध संदर्भ द्या आणि मी त्याबद्दल एक शब्द काढणार नाही. पण विकिपीडिया च्या विरोधात जाऊन जर काही लिहिले गेले असेल, तर मी तेथे दुरुस्त्या करणार.. - Akshaypatill
- टिप्पणी - @Akshaypatill:, आणि इतर सदस्य, जरा दमाने घ्या ही विनंती. छोट्यामोठ्या दुरुस्त्या करणे उचित आहे परंतु या लेखाची sensitivity आणि झालेल्या उलटसुलट चर्चा पाहता थोडा patience आणि AGF (सगळ्यांचाच कडून) आवश्यक आहे. धन्यवाद.. - अभय नातू
- टिप्पणी - @Akshaypatill:, सध्या तुमचे काम लेखासाठी सुधारणा करणे/सुचवणे आहे. तुम्ही जो जो बदल येथे सुचवत आहात त्याला तीन प्रचालक आणि एक प्रशासक तपासत आहेत, या पॉलिसीची जाणीव ठेवावी. लेखासाठी हवे ते वैध, तटस्थ व विश्वसनीय संदर्भग्रंथ वापरण्याची तुम्हाला मुभा आहे. ...तर मी तेथे दुरुस्त्या करणार अशा धमक्या प्रचालकांना देणे टाळाव्यात. अभय नातू यांनी सांगितल्याप्रमाणे, या लेखासाठी काम करताना तुमच्यासह सर्वांनीच थोडा patience ठेवणे आवश्यक आहे. . - संदेश हिवाळे
- टिप्पणी - @संदेश हिवाळे: तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, की लेखन करताना प्रचालक आणि संपादक समान असतात, आणि तुम्ही व आणखी एक तर यामध्ये Involved Admin आहात. कृपया en:WP:INVOLVED वाचा.
- "Editors should not act as administrators in disputes in which they have been involved. This is because involved administrators may be, or appear to be, incapable of making objective decisions in disputes to which they have been a party or about which they have strong feelings."
- आणि मी दुरस्त्या सुचवत नाही आहे. तुम्ही बदल परतवताय म्हणून आधी चर्चेने मार्ग काढण्याचा हा प्रयत्न आहे. मी आधीच सांगितलं आहे की लेखात वापरलेला संदर्भ विश्वासू आणि तटस्थ नाही. तो एका हिंदी प्राध्यापकाने लिहिला आहे, आणि इतिहास लिहिताना आवश्यक कौशल्ये त्यांच्याकडे नसतात. तुम्ही योग्य संदर्भ देऊ शकला नाही तर, मी विकिपीडिया पॉलिसीला अनुसरून बदल करेन. धन्यवाद.. - Akshaypatill
- टिप्पणी - जेथे जेथे तुम्हाला अधिक विश्वसनीय संदर्भाची गरज भासेल तेथे तुम्ही स्वतः तो संदर्भ जोडावा. लेखातील संदर्भांची संख्या तब्बल ६०० आहे, प्रत्येक मुद्द्याला संदर्भ जोडलेला आहे, तेव्हा संदर्भाचा अभाव हे कारणच तयार होत नाही. आवश्यक कौशल्य असतील अशा इतिहासकारांचे संदर्भ ग्रंथ मिळवावे आणि त्याचे संदर्भ लेखात टाकावे.
- तुम्ही इंग्लिश विकिपीडियाचे नियम सांगत आहात आणि तुम्ही जी संपादने/बदल कराल ती इतर चारही प्रचालकांनी विनाअट मान्य केली पाहिजे, अशी अपेक्षा ठेवत आहात. असे होणार नाही. तुम्ही सुचवलेल्या बदलाची समीक्षा झाल्यानंतरच मुख्य लेखात संबंधित बदल करण्यात येईल.
- तुमची चुकीची संपादने आणि योग्य प्रक्रियेने न झालेली संपादने मला हटवावी लागली. त्यामुळे येथे बदल करण्याचा प्रस्ताव ठेवून प्रचालकांच्या सहमतीने संबंधित बदल होऊ द्यावेत.
- वारंवार सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, प्रशासकांनी ठरवून दिलेल्या पद्धतीनेच तुम्ही बाबासाहेब आंबेडकर लेखामध्ये बदल करू शकता. जर तुम्ही येथे बदलाचा प्रस्ताव सादर न करता परस्पर मुख्य लेखात अनुचित बदल केले तर ते निश्चितपणे हटवले जाईल.. - संदेश हिवाळे