धूळपाटी/पाउलचिन्हे
````मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले परमेश्वर नाही घोकत मन मम बसले परि तुम्ही चिंतन विश्वातील प्रवासी का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले ?
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाउलचिन्हे - त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!
......कुसुमाग्रज