धूळपाटी/डोमेन नेम म्हणजे काय
डोमेन म्हणजे काय? डोमेन खरेदी कसे करावे?
आजच्या डिजिटल मार्केटिंग[१] जगात वेबसाईटचे प्रमाण वाढतच चालले आहे, आजपर्यंत लाखो वेबसाईट इंटरनेटवर कार्यरत आहेत आणि काही वेबसाईट तयार केल्या जात आहेत. यापुढेही लाखो वेबसाईट तयार होतील. पण वेबसाईटची संख्या खूप असल्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण झाले असते म्हणून वेबसाईटला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे नाव दिले जाते, त्यालाच डोमेन नेम असे म्हणतात.
लोक त्यांच्या ब्राउझरच्या URL बारमध्ये डोमेन नाव टाईप करतात, आणि त्या साईटवर येतात.
डोमेन नेम हे एखाद्या वेबसाईटची विशिष्ट ओळख असते, म्हणून डोमेन नेम घेताना घाई करू नये. डोमेन घेताना खूप विचारपूर्वक आणि योग्य डोमेन नाव खरेदी करायला हवे.
तसेच डोमेन घेण्यासाठी योग्य नाव सुचत नसेल तर विविध प्रकारचे डोमेन नेम Suggestion Tools सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने एक चांगले डोमेन निवडता येते. तसेच काही कंपन्या डोमेन विक्रीची सुविधासुद्धा पुरवितात.
एक चांगले डोमेन नाव निवडण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना
डोमेन नाव निवडताना अशा प्रकारचे नाव निवडावे की जे सोप्या भाषेमध्ये असेल आणि लोकांच्या सहज लक्षात राहू शकेल.
डोमेन हे केवळ दोन किंवा तीन शब्दांचे असायला हवे, जास्त लांबलचक नाव निवडणे योग्य नाही.
वेबसाईटमध्ये ज्या प्रकारचे कन्टेन्ट असणार आहे, तशाच प्रकारचे डोमेन नाम प्रणाली सिलेक्ट करतात. म्हणजेच ते कन्टेन्टशी संबंधित असते. उदा० साईटमध्ये कन्टेन्ट तंत्रज्ञान या विषयाचे आहे, तर त्या विषयीचा Tech हा शब्द आपल्या डोमेन नेम मध्ये असायला हवा.
डोमेन नेम कोठून खरेदी करतात आणि कसे?
डोमेन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोमेन नेम सुविधा पुरवणाऱ्या वेबसाईट उपलब्ध आहेत, त्या साईट्समधून डोमेन घेता येते. डोमेन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईटवर जाऊन पाहिजे तसे डोमेन विकत घेता येते. एकदा डोमेन नाव विशिष्ट नावाने रजिस्टर झाले की जगामध्ये कोणीही त्या डोमेन नावाचा वापर करू शकत नाही.
डोमेन नेम विक्री करण्याऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. पण विश्वसनीय डोमेन सर्व्हिस प्रोव्हायडर साईट्सकडून डोमेन विकत घेतल्यास, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही.
डोमेन नाव विकत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या पूर्ण स्टेप्स :
- डोमेन नेम निश्चित केल्यावर ते उपलब्ध आहे का नाही ते टूल्समध्ये शोधणे.
- अनेक उपलब्ध डोमेन नावांतून सर्वोत्तम पर्याय निवडणे श्रेयस्कर.
- डोमेन नाव नक्की केल्यावर ऑर्डर फायनल करावी व डोमेनची नोंदणी पूर्ण करतात.
- नवीन डोमेन नेमची मालकी तपासून घेणे जरुरीचे असते.
Domain Name Type in Marathi | डोमेन नेमचे प्रकार
सर्वात महत्त्वाच्या Domain Namesच्या प्रकाराबद्दल माहिती :
TLD (शीर्ष स्तरीय डोमेन)
टॉप लेव्हल डोमेन हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे डोमेन नाव आहे. सर्च इंजिनमध्ये अशा डोमेन नेमला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते म्हणूनच या डोमेनला Top Level Domain असे म्हणतात.
काही उदाहरणे
काही मुख्य टॉप लेवल डोमेन ([./Https://en.wikipedia.org/wiki/Top-level%20domain Top Level Domain] )ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
- .com - डोमेन Commercial वेबसाईट साठी केला जातो. .org - डोमेन Organization वेबसाईट मध्ये केला जातो. .net - डोमेन Networking वेबसाईट मध्ये केला जातो. .gov - डोमेन Government वेबसाईट मध्ये केला जातो. .edu - डोमेन Educational वेबसाईटमध्ये केला जातो.
CcTLD (देश कोड उच्चस्तरीय डोमेन)
[./Https://en.wikipedia.org/wiki/Country%20code%20top-level%20domain Country Code Top Level Domain] (ccTLD) या डोमेनचा वापर केवळ एका विशिष्ट देशामध्ये केला जातो, म्हणून याला “देश कोड उच्चस्तरीय डोमेन” (Country Code Top Level Domain) असे म्हणतात.
काही उदाहरणे :-
काही देश वापरत असलेली देश-कोड उच्चस्तरीय डोमेन्स (Country Code Top Level Domain)ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
- .in - India मध्ये .इन या डोमेनचा वापर होतो.
- .us - United States मध्ये .us या डोमेनचा वापर होतो.
- .ca - Canada मध्ये .ca या डोमेनचा वापर होतो.
- ^ "Marathi Spirit - मराठी ब्लॉग, डिजिटल मार्केटिंग आणि इंटरनेट ची माहिती" (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.