धूळपाटी/अगोळप – रानपारची व्यथाकथा
रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप – रानपार हा एका खाडीच्या मुखाजवळच्या मच्छीमारांचा गाव आहे. महाराष्ट्र शासनाच्या एका समितीने येथे मच्छीमारीसाठी एक धक्का बांधावा अशी शिफारस केली होती. फिनोलेक्स कंपनीने या गावावरच्या डोंगरावर तिथे एक प्लास्टिक ट्यूबचा कारखाना बनवणार आहे असे सांगून गावकऱ्यांची संमती मिळवली होती पण त्या ऐवजी धक्का बांधायच्या आधीच फिनोलेक्स कंपनीने या गावावरच्या डोंगरावर कोळशापासून वीज उत्पादन करायला सुरुवात केली. कोळसा जाळायला सुरुवात करता क्षणी कंपनीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून मच्छीमारांचा धक्का बांधण्याला स्थगिती मिळवली, आणि ताबडतोब तिथे कोळशाची आयात करण्यासाठी धक्का बांधण्याची परवानगी मिळवली. गावकऱ्यांच्या दृष्टीने हे दुहेरी संकट होते. एक तर हवेचे प्रदूषण सहन करायला लागत होते आणि दुसरे तर मच्छी मारीला अडचण आली होती. याच वेळी व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणून तिथे फिनोलेक्सने शिवणकामाचे वर्ग सुरू केले होते.