धालो (लोकनृत्य)
धालो हा गोवा येथील एक लोकप्रिय लोकनृत्य प्रकार आहे.[१] हे नृत्य स्त्रिया सादर करतात आणि त्यांच्या भूदेवीला प्रार्थना म्हणून काम करतात. ज्या गाण्यांवर हे नृत्य केले जाते ते सहसा कोंकणी किंवा मराठी भाषेत गायले जाते. अशा गाण्यांचे विषय सामान्यतः धार्मिक किंवा सामाजिक स्वरूपाचे असतात. हिवाळ्याच्या प्रारंभी पौष महिन्यात हे १ आठवड्याच्या कालावधीत आयोजित केले जाते. शेवटच्या दिवशी स्त्रिया अतिशय सुंदर वेषभूषा करतात.[१][२]
नवी दिल्ली येथील लोकनृत्य महोत्सवात सादर करण्यासाठी धालोची निवड करण्यात आली होती.[३]
इतिहास
हे लोकनृत्य प्रागैतिहासिक काळापासून लोकोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते. भारतातील कोकणी पट्ट्याच्या सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवारपर्यंतच्या भागात हा उत्सव लोकप्रिय आहे.[४] धालो या शब्दाची उत्पत्ती धर्तरी या शब्दापासून किंवा मुंडारी भाषेतील ‘धालोय-धालोय’ शब्दापासून झाली असावी असे मत मांडले जाते. "धालोय"चा अर्थ पंख्यासारखे वाऱ्याच्या झुळकेवर हळुवारपणे असा होतो. या उत्सवातील सर्व विधी भूदेवीच्या पूजेशी संबंधित आहेत.[५][६]
पद्धती
नृत्याच्या या प्रकारात १२-२४ स्त्रिया दोन समांतर पंक्तींमध्ये एकमेकींसमोर आणि एकमेकींना जोडलेले हात घेऊन एकत्र नाचतात. फुगडीच्या तुलनेत हे नृत्य संथ गतीने केले जाते.[७]
परंपरा
धालो उत्सव साजरा करण्यापूर्वी स्त्रिया उत्सवाचा मांड शेणाने सारवतात. मांडाच्या समोर तुळशी वृंदावन उभे करून त्यासमोर समई पेटवून ठेवतात. तसेच पाने, फुले आणि रांगोळी काढून मांड सजवतात. त्याचबरोबर ‘तळी’ ठेवून शेजारी पाण्याने भरलेली घागर ठेवल्यानंतर जमलेल्या सर्व स्त्रिया तुळशीची प्रार्थना करतात. या तळीमध्ये तांदूळ, नारळ, विडा, कुंकू आणि गूळ यांचा समावेश असतो.[८]
त्यानंतर दोन रांगा बनवून स्त्रिया समोरासमोर उभ्या राहून गाणी म्हणायला सुरू करतात. गाणी गाताना स्त्रियांची पहिली रांग दुसऱ्या रांगेपर्यंत समोर जाऊन पुन्हा आपल्या जागी येते पदन्यास आणि सोबतीला विविध गीते गायली जातात. यांमधील सुरुवातीची गाणी ही धर्तरी माता, स्थलदेवता, ग्रामदैवता आणि निसर्गातील वनदेवीसारख्या देवतांनी नमन करणारी असतात. देवांची गाणी झाल्यावर कृष्णगीते, कौटुंबिक आणि सामाजिक विषयावरील गाणी होतात. ही गाणी रामायण आणि महाभारतावर देखील असतात. पुढे रांगा बदलल्या जाऊन गाणी आणि नृत्य होते. अधूनमधून तोंडातून फू-फू असा आवाज काढतात.[९][१०]
संपूर्ण उत्सवात पुरूषांना प्रवेश नसतो. बांधव म्हणून फक्त एक पुरूष तेवढा सहभागी होतो. सर्व कष्टकरी समाजातील मुली आणि स्त्रिया या उत्सवात भाग घेतात. यामध्ये फक्त ब्राह्मण आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील स्त्रिया नसतात. दरवर्षी पौष आणि माघ महिन्यातील रात्री गाणी गाऊन आणि नृत्य करून पाच, सात, नऊ किंवा अकरा रात्री हा उत्सव साजरा होतो. मांड ही गावातील एक सामायिक जागा असते किंवा एक पवित्र जागा असते.[२]
संदर्भ
- ^ a b Tourism, Dept of. "Come celebrate the 2nd Annual Heritage Festival in Goa – Department of Tourism, Government of Goa" (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ a b मराठी, विश्वकोश (२०१९). "धालो (Dhalo)".
- ^ Assembly, Goa, Daman and Diu (India) Legislative (1967). Debates; Official Report (इंग्रजी भाषेत).
- ^ "List of Folk Dances of Different States in India". www.jagranjosh.com. 2022-01-03. 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ Jan 5, Rajendra P. Kerkar / TNN /; 2009; Ist, 02:36. "Dhalo expresses gratitude to mother earth | Goa News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Feb 9, Rajendra P. Kerkar / TNN /; 2011; Ist, 00:38. "When Christian Gawdas danced to celebrate Dhalo | Goa News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Src="https://Secure.gravatar.com/Avatar/0fdaa5f5742b1df0ab382d42942e6879?s=160, <img Alt=""; amp;d=identicon; Srcset="https://Secure.gravatar.com/Avatar/0fdaa5f5742b1df0ab382d42942e6879?s=320, Amp;r=g"; amp;d=identicon; Loading="lazy">, Amp;r=g 2x" Height="160" Width="160" (2021-07-06). "13 Popular Folk Dances of Goa". Kuntala's Travel Blog (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ Delhi, Publications Division (India),New (1960-05-22). AKASHVANI: Vol. XXV. No. 21. ( 22 MAY, 1960 ) (इंग्रजी भाषेत). Publications Division (India),New Delhi.
- ^ by (2017-10-30). "Folk Dances of Goa". GOA PCS Exam Notes (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.
- ^ "6 Traditional Goan Folk Dances (2022)". TheTopTours (इंग्रजी भाषेत). 2021-02-24. 2022-02-09 रोजी पाहिले.