Jump to content

धाबे

धाबे (अनेकवचन: धाबी) ही दक्षिण आशियातील पारंपरिक घरांमध्ये आढळणारा छतांचा एक प्रकार आहे.

रचना

धाब्याचे छप्पर घालण्याची पद्धत अशी असते : लाकडाचे किंवा बांबूचे कमी व्यासाचे उभे आडवे लांब खांब टाकून त्यावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या रचतात. त्यावर मातीचे दीड-दोन फूट जाडीचे थर घालतात []. मातीचे हे थर चांगले धोपटले गेल्यावर त्यांवर कोळशाच्या खरीचा थर घालतात. ही खर पाणी शोषून घेते[]. बेताचे पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशांत पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करण्यास धाब्यांवरील खरीचा थर उपयुक्त ठरतो.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b रानडे,फिरोझ. "ब्राह्मण-वाड्यापासून बामन-वाड्यापर्यंत". पद्मगंधा दिवाळी अंक, इ.स. २०१२. pp. ७२.